________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
____ 15
ना! दररोज सीमंधर स्वामींचे दर्शन, तेथील पंच परमेष्ठींचे, अन्य एकोणीस तीर्थंकरांचे, हे सर्व जे दररोज बोलायला सांगतो, ते एकाच हेतूसाठी की आता तुमचे आराधक पद तिथे आहे. ___ आता येथे, या क्षेत्रात आराधक पद राहिले नाही! म्हणून आम्ही दादा भगवानांच्या साक्षीने तेथील ओळख करवून देतो. मी एका व्यक्तिला सांगितले की 'भाऊ, तुम्ही असे समजा की हे महाविदेह क्षेत्र आहे आणि तुम्ही महाविदेह क्षेत्रात आहात, अशी कल्पना करा. सीमंधर स्वामी तेथे कलक्त्यात आहेत, तर तुम्ही इथून दर्शन करण्यासाठी कलक्त्याला किती वेळा जाल? किती वेळा जाऊ शकाल?
प्रश्नकर्ता : एक वेळा किंवा जास्तीत जास्त दोन वेळा.
दादाश्री : हो, जास्तीत जास्त दोन वेळा. तर महाविदेह क्षेत्रात जो लाभ मिळतो, तो लाभ आपल्या या क्षेत्रात दररोज मिळेल असे मी करुन देईल. अशी चावी माझ्याकडे आहे. म्हणून सीमंधर स्वामींनी अशी नोंद घेतली की असे कोणी भक्त झाले नाही की जे दररोज दर्शन करतात! राहतात परदेशात तरी दररोज दर्शन करण्यास येतात! तिथे जाण्यासाठी गाडीची गरज नाही की घोड्याचीही गरज नाही. फक्त दादा भगवान श्रु म्हटले म्हणजे नमस्कार पोहोचले.
माध्यमाशिवाय, पोहोचत नाही
प्रश्नकर्ता : ‘प्रत्यक्ष दादा भगवानांच्या साक्षीने सीमंधर स्वामींना नमस्कार करतो,' हे सीमंधर स्वामींना पोहोचते, ते ‘पाहू' शकतात ही वास्तविकता आहे ना?
दादाश्री : ते पाहताना सामान्य भावाने पाहतात. तीर्थंकर विशेष भावाने पाहत नाही. ह्या दादा भगवानांच्या माध्यमाने म्हटले आहे, म्हणून तिथपर्यंत पोहोचते. पण माध्यमाशिवाय पोहोचत नाही.