________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
आहे, पण हे माझ्या ज्ञानात आलेले आहे. हे सामान्य लोकांना समजणार नाही. परंतु आम्हाला एक्झेक्ट (जसे आहे तसे) समजते. त्यांच्या दर्शनानेच लोकांचे कल्याण होईल.
प्रश्नकर्ता : त्यांचा देह कसा असतो! मनुष्यासारखा? आपल्यासारखा?
दादाश्री : देह आपल्यासारखाच, माणसासारखाच आहे. प्रश्नकर्ता : त्यांच्या देहाचे प्रमाण काय आहे?
दादाश्री : प्रमाण खूप मोठे, विशाल असते. त्यांची उंची खूप आहे. त्यांना आयुष्य सुद्धा खूप आहे. प्रत्येक गोष्ट वेगळीच आहे.
महाविदेह क्षेत्र कुठे? कसे? प्रश्नकर्ता : सीमंधर स्वामी जिथे विचरतात ते महाविदेह क्षेत्र कुठे आहे?
दादाश्री : ते तर आपल्या ह्या भरतक्षेत्रापेक्षा खूपच वेगळे आहे, ईशान्य दिशेत आहे. प्रत्येक क्षेत्र वेगवेगळे आहे. तिथे आपण जाऊ शकत नाही.
प्रश्नकर्ता : महाविदेह क्षेत्र, हे आपल्या भरतक्षेत्रपेक्षा वेगळे मानले जाते का?
दादाश्री : हो, वेगळे. हे एक महाविदेह क्षेत्रच असे आहे की, जिथे सदैव तीर्थंकर जन्माला येतात. आणि येथे आपल्या क्षेत्रात काही निश्चितकाळातच तीर्थंकर जन्माला येतात, त्या नंतर नाही. आपल्या येथे काही काळापूरते तीर्थंकर नसतातही, पण आता हे जे सीमंधर स्वामी आहेत, ते आपल्यासाठी आहेत. ते अजुन दिर्घ काळापर्यंत राहणार आहेत.
भूगोल, महाविदेह क्षेत्राचे प्रश्नकर्ता : आता महाविदेह क्षेत्राविषयी सविस्तर माहिती सांगा.