________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
प्रश्नकर्ता : सीमंधर स्वामी महाविदेह क्षेत्रात आणखी काय करतात?
दादाश्री : त्यांना तर काहीच करायचे नसते ना. कर्माच्या उदयानुसार, उदयकर्म जे करवतील तसे करतात. त्यांचा स्वत:चा इगोइजम (अहंकार) संपून गेलेला असतो आणि पूर्ण दिवस ते ज्ञानातच राहतात, जसे महावीर भगवान राहत होते तसे. त्यांचे खूप सारे अनुयायी असतात.
फक्त दर्शनानेच मोक्ष प्रश्नकर्ता : सीमंधर स्वामींच्या दर्शनाचे वर्णन करा.
दादाश्री : सीमंधर स्वामींचे वय आता दिड लाख वर्ष आहे. ते ऋषभदेव भगवंतांसारखे आहेत, ऋषभदेव भगवान संपूर्ण ब्रम्हांडाचे भगवंत म्हटले जातात. तसेच सीमंधर स्वामी सुद्धा संपूर्ण ब्रह्मांडाचे भगवंत म्हटले जातात. ते आपल्या येथे नाही परंतु दुसऱ्या भूमिवर आहेत. जिथे मनुष्य पोहोचू शकत नाही. (जेव्हा ज्ञानींना काही महत्वाचे विचारायचे असते तेव्हा) ज्ञानी स्वत:ची शक्ति तिथे पाठवतात. ती शक्ति विचारुन परत येते. आपण तिथे स्थूळ देहाने जाऊ शकत नाही, पण जेव्हा तिथे जन्म होतो तेव्हा जाऊ शकतो.
आपल्या इथे भरतक्षेत्रात तीर्थंकरांचा जन्म होत होता, पण अडीच हजार वर्षांपासून बंद झाले आहे! तीर्थंकर म्हणजे अंतिम, 'फूल मून' (पौर्णिमेचा पूर्ण चंद्र). पण तिथे महाविदेहक्षेत्रात तीर्थंकर कायम जन्म घेतात. सीमंधर स्वामी आज तिथे हयात आहेत.
प्रश्नकर्ता : ते अंतर्यामी आहेत का?
दादाश्री : ते आपल्याला पाहू शकतात. आपण त्यांना पाहू शकत नाही, ते पूर्ण जगाला पाहू शकतात.
सीमंधर स्वामी दुसऱ्या क्षेत्रात आहेत, ही बुद्धीच्या पलिकडील गोष्ट