________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
इतके योजन दूर हा मेरु पर्वत, ह्या ज्या गोष्टी शास्त्रात लिहीलेल्या आहेत, त्या बरोबर आहेत का?
दादाश्री : हो बरोबर आहे. त्यात फरक नाही. त्या गोष्टींमध्ये तथ्य आहे. हो, इतक्या वर्षांचे आयुष्य, आणि आणखी किती वर्ष राहतील, असे हे सर्व सुनियोजित आहे. संपूर्ण ब्रह्मांड आहे, त्यात मध्यलोक आहे आणि त्यात पंधरा प्रकारचे क्षेत्र आहेत. मध्यलोक गोलाकार आहे. परंतु लोकांना ह्या दुसऱ्या काही गोष्टी समजत नाही. कारण एका वातावरणातून दुसऱ्या वातावरणात जाता येत नाही असे क्षेत्र आहेत आत. मनुष्याला जन्म घेण्या लायक आणि राहण्यालायक पंधरा क्षेत्र आहेत. त्यातील एक आपली भूमि आहे. त्या व्यतिरिक्त इतर चौदा आहे. तिथे सुद्धा आपल्यासारखीच माणसं आहेत. आपल्या येथील कलियुगी (मनुष्य) आहेत. आणि तेथे सत्युगी आहेत. काही ठिकाणी कलीयुग आहे आणि काही ठिकाणी सत्युग सुद्धा आहे. अशा प्रकारे मनुष्य आहेत आणि त्यातीथे महाविदेह क्षेत्रात तर आता प्रत्यक्ष सीमंधर स्वामी हजर आहेत. आता त्यांचे वय दिड लाख वर्ष आहे आणि ते आणखी सव्वा लाख वर्ष राहणार आहेत. भगवंत रामचंद्रजींच्या वेळेस ते होते. श्री रामचंद्रजी ज्ञानी होते. ते येथे जन्माला आले होते, पण तरी देखील ते सीमंधर स्वामींना पाहू शकले होते. सीमंधर स्वामी तर त्यांचाही पूर्वीचे, खूप पूर्वीचे आहेत! हे जे सीमंधर स्वामी आहेत त्यांना जगत् कल्याण करायचे आहे.
श्री सीमंधर स्वामी, भरत क्षेत्राच्या कल्याणाचे निमित्त
प्रश्नकर्ता : जसे महाविदेह क्षेत्रात आता वर्तमानात तीर्थंकर विराजमान आहेत, असे दुसऱ्या एखाद्या क्षेत्रात तीर्थंकर विराजमान आहेत का?
दादाश्री : पाच भरतक्षेत्रात आणि पाच ऐरावत क्षेत्रात आता कोणी तीर्थंकर विराजमान नाहीत. अन्य पाच महाविदेह क्षेत्र आहेत तिथे आता चौथा आरा चालु आहे, तिथे तीर्थंकर विचरत आहेत. तिथे सदैव चौथा