________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
सुद्धा जर कोणी सीमंधर स्वामींचे नाव घेत नसेल, पण महावीर भगवानांचे नाव घेत असेल तरीही ते चांगले आहे. परंतु महावीर भगवानांचे ऐकणार कोण? ते स्वत: तर सिद्धगतीत जाऊन बसले!! त्यांना इथे काही देणे-घेणे नसते ना! हे तर आपण स्वत:हून त्यांचे रुपक बनवून बनवून स्थापित करत राहतो. ते आता तीर्थंकर सुद्धा म्हटले जाणार नाहीत. ते तर आता सिद्धच आहेत. हे सीमंधर स्वामी हजर आहेत तेच फळ देवू शकतील.
प्रश्नकर्ता : अर्थात जे फळ मिळते ते 'नमो अरिहंताणं'चेच फळ मिळते, असेच झाले ना? मग 'नमो सिद्धाणं'चे काहीच फळ नाही?
दादाश्री : दूसरे काही फळ मिळत नाही, हे तर आपण असे विचारले की, 'भाऊ, कोणत्या स्टेशनला जायचे आहे ?' तेव्हा आपण नक्की करुन घ्यावे की मुंबईला जायचे आहे. तेव्हा मुंबई आपल्या लक्षात राहते. असेच हे मोक्षात जायचे, सिद्धगतीत जायचे, याकडे लक्ष लागते. बाकी सर्वश्रेष्ठ उपकारी तर अरिहंतच म्हटले जातात. अरिहंत कोणाला म्हणतात? जे हजर असतात. त्यांना जे गैरहजर असतात त्यांना अरिहंत म्हटले जात नाही. प्रत्यक्ष-प्रकट असले पाहिजे. म्हणून तुम्ही सदैव सीमंधर स्वामींना लक्षात ठेवा. तसे तर वीस तीर्थंकर आहेत. पण दूसरी सर्व नावे आपल्या लक्षात राहतील का? त्यापेक्षा आपल्या हिंदुस्तानासाठी जे विशेष महत्वाचे मानले जातात, ते आहेत सीमंधर स्वामी, त्यांच्यावरच लक्ष केंद्रीत करा. आणि त्यांच्यासाठीच जीवन अर्पण करा आता.
दृष्टी, भगवंताच्या दर्शनाची । प्रश्नकर्ता : महाविदेह क्षेत्रात सीमंधर स्वामींची प्रवृत्ति कोणती आहे?
दादाश्री : त्यांची कसली प्रवृत्ति? बस, ते तर वीतराग भगवंत! लोक त्यांचे दर्शन करतात आणि ते वीतराग भावाने वाणी बोलतात.
प्रश्नकर्ता : देशना? दादाश्री : हो, बस, देशना देतात.