________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
नवकार मंत्र बोलतेवेळी त्यासोबत सीमंधर स्वामी लक्षात असायला पाहिजे, तरच तुमचा नवकार मंत्र शुद्ध रुपाने म्हटला गेला असे म्हटले जाईल.
4
लोक मला विचारतात की तुम्ही सीमंधर स्वामींचे नाव का बोलवून घेता ? चोवीस तीर्थंकरांचे बोलायला का नाही सांगत ? मी म्हणालो की चोवीस तीर्थंकरांचे तर बोलतच असतो. पण आम्ही पद्धतशीर बोलतो. आणि सीमंधर स्वामींचे जास्त बोलत असतो, कारण ते वर्तमान तीर्थंकर आहेत आणि 'नमो अरिहतांण' त्यांनाच पोहोचते.
हे तर प्रकट, प्रत्यक्ष, साक्षात् भगवान
प्रश्नकर्ता : सीमंधर स्वामी प्रकट म्हटले जातात का ?
दादाश्री : हो, ते प्रकट म्हटले जातात. प्रत्यक्ष, साक्षात (हजर) आहेत, देहधारी आहेत. आणि सध्या महाविदेह क्षेत्रात तीर्थंकर रुपात विचरत(वावरत) आहेत.
प्रश्नकर्ता : सीमंधर स्वामी तर आता महाविदेह क्षेत्रात आहेत, मग ते आमच्यासाठी प्रकट आहेत असे कसे म्हणू शकतो ?
दादाश्री : सीमंधर स्वामी कलक्त्यात असतील आणि आपण त्यांना पाहिलेले नसेल, तरी देखिल ते प्रकट मानले जातात. अशाच प्रकारे या महाविदेह क्षेत्राचेही आहे.
प्रत्यक्ष-परोक्षच्या स्तुतीत फरक
प्रश्नकर्ता : आपण महावीर भगवानांची स्तुती केली, प्रार्थना केली आणि सीमंधर स्वामींची स्तुती केली, प्रार्थना केली तर ह्या दोघांच्या फलश्रुतीत काय फरक पडतो ?
दादाश्री : भगवान महावीर तर स्वतःची स्तुती ऐकतच नाही, तरी