________________
‘प्रत्यक्ष दादा भगवानांच्या साक्षीने, वर्तमानात महाविदेह क्षेत्रात विचरत असणारे तीर्थंकर भगवान श्री सीमंधर स्वामींना अत्यंत भक्तिपूर्वक नमस्कार करीत आहे'
हे शब्द म्हणजे अनुसंधान नाही, पण त्यावेळी मुमुक्षूंना ते स्वतः श्री सीमंधर स्वामींना नमस्कार करीत आहेत अशी अनुभूती होते, हे अनुसंधान आहे. 'प्रत्यक्ष दादा भगवानांच्या साक्षीने' असा शब्दप्रयोग यासाठी प्रयोजित करण्यात आला आहे की, जोपर्यंत मुमुक्षुचे श्री सीमंधर स्वामींसोबत सरळ तार जोडलेला नाही. तोपर्यंत ज्यांच्या तार निरंतर त्यांच्याशी जोडलेला आहे, असे ज्ञानीपुरुष श्री दादा भगवानांच्या माध्यमाने आपण श्री सीमंधर स्वामींना आपला नमस्कार पोहचवतो. ज्याचे फळ प्रत्यक्ष नमस्कार केल्या इतकेच मिळते. उदाहरणानूसार समजा आपल्याला एखादा संदेश अमेरिकेला पोहोचवायचा आहे, परंतु तो संदेश आपण स्वतः पोहोचवू शकत नाही, म्हणून आपण तो संदेश पोस्ट ऑफिसला सुपुर्द करुन निश्चिंत होऊन जातो. ही जबाबदारी पोस्ट ऑफिसची आहे आणि ते योग्य तऱ्हेने ती पूर्णही करतात. याचप्रमाणे आपला संदेश श्री सीमंधर स्वामींपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पूज्य दादाश्री स्वतःवर घेतात.
दादा भगवानांना साक्षी ठेवून नमस्कार विधी करावी. ज्यांना सम्यक् दर्शन प्राप्त झाले आहे, अशा समकितधारी महात्म्यांनी समजपूर्वक ही नमस्कारविधी केली तर त्याचे फळ अनन्य मिळते ! मंत्र बोलतेवेळी एकएक अक्षर लक्षपूर्वक वाचला पाहिजे. त्यामुळे चित्त पूर्णपणे शुद्ध रहाते. संपूर्ण चित्तशुद्धीपूर्वकचे नमस्कार म्हणजे स्वयं स्वतःला श्री सीमंधर स्वामींच्या मुर्तीस्वरुपाला प्रत्यक्ष नमस्कार करत आहे असे पाहावे. प्रत्येक नमस्कारासोबत स्वतःला साष्टांग नमस्कार करताना दिसले पाहिजे. जेव्हा प्रभुंचे मूर्त स्वरुप दिसते आणि त्याचसोबत प्रभुंचे अमूर्त असे केवळज्ञान स्वरुप, की जे मूर्त स्वरुपाहून भिन्न आहे, हे सुद्धा लक्षात येईल, तेव्हा समजावे की आपण श्री सीमंधर स्वामींच्या निकट पोहोचलो आहोत दादाश्रींच्या श्रीमुखाने श्री सीमंधर स्वामींसोबतच्या संधानाविषयी ऐकल्यावर अनेक लोकांना अशी अनुभूती झालेली आहे.