________________
अशी आशा आहे की, ज्यांना दादाश्रींना प्रत्यक्ष भेटण्याचा योग मिळाला नाही, त्यांना ही पुस्तिका परोक्ष रुपाने संधानाची भूमिका स्पष्ट करवून देईल. जी व्यक्ति खरोखर मोक्षप्राप्तीकरिता इच्छुक असेल, त्याचे श्री सीमंधर स्वामींसोबत अवश्य अनुसंधान होऊन जाईल. यापूर्वी कधीही उत्पन्न झाले नसेल, असे जबरदस्त आकर्षण श्री सीमंधर स्वामी प्रति उत्पन्न झाले, तर समजून जावे की प्रभुंच्या श्रीचरणात स्थान मिळण्याची चाहूल लागली आहेत.
सीमंधर स्वामींची प्रार्थना, विधी आणि सीमंधर स्वामींच्या श्रीचरणात सदैव नतमस्तक राहून त्यांचे अनन्य शरण प्राप्त करण्याची निरंतर भावना करावी. संपूज्य दादाश्रींनी वारंवार सांगितले आहे की आम्ही सुद्धा सीमंधर स्वामींजवळ जाणार आहोत आणि तुम्ही सुद्धा तिथेच पोहोचण्याची तयारी करा. त्याशिवाय एकावतारी किंवा दोन अवतारी होणे हे कठीण आहे! कारण पुढचा जन्म जर पुन्हा याच भरतभूमीवर झाला तर तेव्हा इथे भयंकर पाचवा आरा चालु असेल. तेव्हा इथे मोक्षाची गोष्ट तर दूरच राहिली परंतु पुन्हा मनुष्यजन्म मिळणे हे सुद्धा दुर्लभ आहे ! अशा संयोगात आतापासूनच सावध होऊन, ज्ञानींनी दाखविलेल्या मार्गावर चालून एकावतारी पदाची प्राप्ती करुन घ्यावी! पुन्हा-पुन्हा अशी संधी मिळणे शक्य नाही. वाहत्या पाण्याच्या प्रवाहाला पुन्हा पकडू शकत नाही. गेलेली वेळ सुद्धा पुन्हा आणू शकत नाही. जो आलेली संधी गमावतो, त्याला पुन्हा संधी मिळत नाही. म्हणून आजपासूनच चिकाटीने मागे लागावे आणि गात रहावे....
'सीमंधर स्वामींचा असीम जय जयकार हो!'
सीमंधर स्वामी कोण आहेत? कुठे आहेत? कसे आहेत? त्यांचे पद काय आहे? तसेच त्यांचे महत्व किती आहे? अशी शक्य तेवढी समग्र माहिती पूज्य दादाश्रींच्या स्वमुखाने निघाली होती. त्याचे इथे संक्षिप्तमध्ये संकलन होऊन प्रकाशित होत आहे. जे मोक्षमार्गांना त्यांच्या आराधनेकरिता अत्यंत उपयोगी सिद्ध होईल!
-डो. नीरुबहन अमीन