________________
श्री सीमंधर स्वामींचे जीवनचरित्र आपल्या भारतदेशाच्या ईशान्य दिशेत करोडो किलोमीटराच्या अंतरावर जंबुद्वीपाच्या महाविदेह क्षेत्राची सुरुवात होते. त्यात ३२ 'विजय' (क्षेत्र) आहेत, या विजयांमध्ये आठवी विजय 'पुष्पकलावती' आहे. त्याची राजधानी श्री पुंडरिकगिरी आहे. या नगरीत मागील चोविसीचे सतरावे तीर्थंकर श्री कुन्थुनाथ भगवंतांच्या शासनकाळ आणि अठरावे श्री अरहनाथजींचा जन्म होण्यापूर्वीच्या काळात श्री सीमंधर स्वामी भगवंतांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील श्री श्रेयांस पुंडरिकगिरी नगरीचे राजा होते. सीमंधर स्वामींच्या आईंचे नाव सात्यकी होते.
यथासमय महाराणी सात्यकीने अद्वितीय रुप-लावण्यमय, सर्वांग सुंदर, सुवर्ण कांतीवाले तसेच वृषभाचे लांछन असलेल्या पुत्राला जन्म दिला. (वीर संवतच्या गणनेनुसार चैत्र कृष्णपक्ष दशमीच्या मध्यरात्री.) बाळ जीनेश्वर, की ज्यांना जन्मतःच मतिज्ञान, श्रुतज्ञान आणि अवधिज्ञान होते. त्यांचे देहमान पाचशे धनुष्याएवढे आहे. राजकुमारी श्री रुक्मिणी यांना प्रभुंची अर्धांगिनी बनण्याचे परम सौभाग्य प्राप्त झाले.
भरत क्षेत्रातील विसावे तीर्थंकर श्री मुनिसुव्रत स्वामी तसेच एकविसावे तीर्थंकर श्री नेमीनाथजी यांच्या प्राकट्य काळाच्या मध्यवर्ती काळात, अयोध्येत राजा दशरथाच्या शासनकाळा दरम्यान आणि रामचंद्रजींच्या जन्मापूर्वी श्री सीमंधर स्वामींनी महाभिनिष्क्रमण उदययोगाने फाल्गुन शुक्लपक्षाच्या तृतीयेच्या दिवशी दिक्षा अंगीकारली. दिक्षा घेताच त्यांना चौथे मनःपर्यव ज्ञान प्राप्त झाले. दोषकर्मांची निर्जरा होताच हजार वर्षांच्या छद्मस्थकाळानंतर बाकीच्या चार घाती कर्मांचा क्षय करुन चैत्र शुक्ल त्रयोदशीच्या दिवशी भगवंत केवळज्ञानी आणि केवलदर्शनी झाले. त्यांच्या मात्र दर्शनानेच जीव मोक्षमार्गी बनू लागले.
___ श्री सीमंधर स्वामी प्रभुंच्या कल्याणयज्ञाच्या निमित्तांमध्ये चौऱ्यांशी गणधर, दहा लाख केवळज्ञानी महाराजा, शंभर करोड साधु, शंभर करोड