________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
वर्तमान तीर्थंकरांच्या भक्तिने 'मोक्ष'
प्रश्नकर्ता : सीमंधर स्वामी कोण आहेत ? ते समजविण्याची कृपा करावी !
दादाश्री : सीमंधर स्वामी वर्तमान तीर्थंकर साहेब आहेत. ते ह्या पृथ्वीच्या बाहेरील दूसरे क्षेत्र, महाविदेह क्षेत्रात तीर्थंकर साहेब आहेत. जसे ऋषभदेव भगवान झाले, महावीर भगवान झाले.... त्यांच्यासारखे हे सीमंधर स्वामी तीर्थंकर आहेत.
तीन प्रकारचे तीर्थंकर असतात. एक भूतकाळातील तीर्थंकर, एक वर्तमानकाळातील तीर्थंकर आणि एक भविष्यकाळातील तीर्थंकर ! यातील भूतकाळातील तीर्थंकर होऊन गेले. त्यांचे स्मरण केल्याने आपल्याला पुण्यफळ मिळते. त्याशिवाय आता ज्यांचे शासन चालु आहे त्यांच्या आज्ञेत राहिल्याने धर्मध्यान उत्पन्न होते. ते आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाणारे ठरते !
पण जर कधी आपण वर्तमान तीर्थंकरांचे स्मरण केले, तर ती गोष्टच वेगळी असते ! खरी तर वर्तमानाचीच किंमत आहे. रोख रुपये असतील तर त्याचीच किंमत असते. जे नंतर येतील ते रुपये भावी ! आणि (भूतकाळातील तर) जे गेले ते गेले! म्हणजे रोख गोष्ट पाहिजे आपल्याला! म्हणूनच रोख असलेल्यांची ओळख करवून देत आहोत ना! आणि ह्या साऱ्या गोष्टी सुद्धा रोखच आहेत. धीस इज द कॅश बँक ऑफ डिवाइन सोल्युशन ! रोख पाहिजे उधार चालणार नाही. आणि चोवीस तीर्थंकरांना सुद्धा आपण नमस्कार करत असतो ना!