________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
रहा, मजा करा, अशाप्रकारे आपल्याला सर्वकाही विचारपूर्वक केले पाहिजे. घरातल्या माणसांबरोबर क्लेश कधीही नाही केला पाहिजे. त्याच घरात रहायचे तर बाचाबाची करण्यात काय अर्थ आहे? कोणाला त्रास देऊन तुम्ही सुखी व्हाल हे शक्यच नाही. आपल्याला तर सुख देऊन सुख घ्यायचे आहे. आपण घरात सुख दिले तरच सुख मिळेल. ती चहा-पाणी पण नीट बनवून देईल, नाहीतर चहा पण नीट बनवणार नाही.
ही तर किती चिंता-संताप! जरा पण मतभेद कमी होत नाहीत. तरी सुद्धा मनात मानतो की मी किती धर्म केले! अरे, घरात मतभेद टळला का? कमी तरी झाला आहे का? चिंता कमी झाली? थोडी फार शांती आली? तेव्हा बोलतात, नाही, पण मी धर्माचे तर केलेच न? अरे, त्याला तू धर्म म्हणतो? धर्म तर अंतरशांती देतो, आधि-व्याधी-उपाधी होऊ देत नाही, त्यास धर्म म्हणतात!
स्वभावा (आत्मा) कडे जाणे यास धर्म म्हणतात. हे तर क्लेश परिणाम सारखे वाढतच जातात!
पत्नीच्या हातातून एवढ्या मोठ्या पंधरा-वीस काचेच्या डिश आणि ग्लास वेर (काचे ची भांडी) पडून फुटले तर. त्यावेळी आपल्यावर काही परिणाम होतो का?
दुःख झाले, म्हणून बडबडल्या शिवाय राहत नाही ना! हा रेडियो वाजल्या शिवाय रहातच नाही. दु:ख झाले की रेडियो सुरु, मग तिला पण दुःख होते. त्यावर ती पण काय बोलते, हं.... जसे काय तुमच्या हातून कधी काही फुटतच नाही. ही समजण्याची गोष्ट आहे की डिश पडतात ना? आपण सांगितले की ते तु फोडून टाक तर फोडेल का ती? नाही फोडणार. मग हे कोण फोडत असेल? ह्या वर्ल्ड मध्ये कोणताही मनुष्य एकही डिश फोडण्याची शक्ति ठेऊ शकत नाही. हा तर सर्व हिशोब पूर्ण होतो आहे. डिश फुटेल तेव्हा आपण तिला विचारले पाहिजे तुला लागले तर नाही ना?!
जर सोफ्यावरुन भांडण होत असेल तर सोफ्याला बाहेर फेकून द्या. हा सोफा तर दहा-वीस हजारांचा असेल. मूर्खा, त्यासाठी भांडण कसले?