________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
१९
ही तर माझी आपबीती सांगतो आहे हं. माझी आपबीती सांगितली तर तुम्हा सर्वांना समजेल की ह्यांच्यावर सुद्धा ही परिस्थिती आली होती. तुम्ही तर असे सरळ सरळ कबूल करणार नाही, हे तर मी कबुल करतो.
प्रश्नकर्ता : आपण बोलता, तेव्हा सगळ्यांना स्वत:चेही आठवते आणि ते कबूलही करतात.
दादाश्री : नाही तुम्ही कबूल करत नाही, पण मी तर कबूल करतो की माझ्यावर ही परिस्थिती आली होती, असे घडले होते की नाही? अरे, नांगी मारता तर कशी मारता, की तू तुझ्या घरी चालती हो. असे बोलता. अरे मेल्या, ती गेली तर तुझी काय दशा होईल? ती तर ह्या कर्माने बांधलेली आहे. कुठे जाईल बिचारी? पण हे जे तू बोलतो आहेस ते व्यर्थ नाही जाणार, त्याने तिच्या हृदयावर घाव पडतील, नंतर तो घाव तुझ्यावर पडेल. मुर्खा, ही कर्मे भोगावी लागतील. हे तर तू असे समजतो की आता कुठे जाणार आहे ती? असे बोलू नये. आणि असे बोलत असाल तर ती चुकच म्हटली जाईल ना! थोडेफार टोमणे तर तुम्ही सर्वांनी मारलेले की नव्हते मारले?
प्रश्नकर्ता : हो मारले आहेत, सर्वांनी मारले आहेत. ह्यात अपवाद नाही. प्रमाण कमी-जास्त असेल, पण अपवाद नसेल.
दादाश्री : तर असे आहे सारे, आता ह्या सगळ्यांना शहाणे बनवायचे आहे, बोला आता हे कसे शहाणे बनतील? पहा फजिती, फजिती ! एरंडेल तेल प्यालेत अशी तोंड झाली आहेत! छान छान बासुंदी आणि छान छान जेवण जेवतात, तरीही एरंडेल तेल पिल्यासारखे तोंड दिसत आहे. एरंडेल तेल तर महाग झाले आहे, कुठून आणून पिणार? पण हे तर असेच, एरंडेल तेल प्यायलासारखे तोंड दिसतात.
प्रश्नकर्ता : घरात मतभेद संपवण्यासाठी काय करावे?
दादाश्री : मतभेद का होतात, याचा आधी शोध घ्यावा. कधी असे मतभेद होतात का की, एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे, तर मग दोन्ही मुलगे का नाहीत, ह्यावर मतभेद होतात का?