________________
१०८
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
जरा जास्त घाला. तुम्हाला त्यांना फक्त सांगायचे आहे. भांडण करू नका. चहासोबत नाष्टा-वगैर जे काही करायचे असेल ते करून मग जेवण करून कामावर जायचे. जेवण करून कामावर वर गेलात की तिथले कर्तव्य पूर्ण करा.
घरून कटकट केल्याशिवाय निघा. मग जॉब वरून परत यावे. जर जॉब वर बॉससोबत भानगड झाली असेल, तर ती रस्त्यातच शांत करून घ्या. ह्या ब्रेनचा (डोक्याचे) चेक नट गरम झाला असेल तर तो नट दाबून द्या. आणि शांतपणे घरी या, अर्थात घरात काही बाचाबाची करु नका. तुम्ही बॉसबरोबर भांडता त्यात बायकोचा बिचारीचा काय दोष? तुझे बॉसबरोबर भांडण होते की नाही?
प्रश्नकर्ता : होते ना!
दादाश्री : मग त्यात बायकोचा काय दोष? तिथे भांडण करुन आला असाल, तर पत्नी समजून जाते की स्वारी आज चांगल्या मूडमध्ये नाही. तेव्हा मूडमध्ये नसता ना?
प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : अर्थात् अशी व्यवस्था एका दिवसाची करून द्या, वर्किंग डे ची. आणि दुसरी होली डे ची. दोनच प्रकारचे दिवस येतात. कामाचा आणि सुट्टीचा तिसरा कुठला दिवस येतच नाही ना? अर्थात दोन दिवसांची योजना केली की मग त्या प्रमाणे चालत रहाणार.
प्रश्नकर्ता : आता सुट्टीच्या दिवशी काय करावे?
दादाश्री : सुट्टीच्या दिवशी नक्की करावे की आज सुट्टीचा दिवस आहे मुलं-बाळ, पत्नी, सर्वांना फिरायला मिळत नाही म्हणून जेवणानंतर त्या सर्वांना फिरायला घेऊन जा. सुट्टीच्या दिवशी छान छान जेवण बनवा. जेवणा नंतर फिरायला घेऊन. फिरण्याच्या खर्चाची मर्यादा ठेवावी की होली डेच्या दिवशी इतकाच खर्च! एखाद्या वेळेस एक्स्ट्रा (जास्त) खर्च करावा लागला तर आपण बजेट बनवू, नाहीतर इतकाच खर्च. असे सर्व तुम्ही नक्की केले पाहिजे. वाईफकडूनच तुम्ही ठरवून घ्यायचे.