Book Title: Pati Patnicha Divya Vyavhar
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 123
________________ ११० पति-पत्नीचा दिव्य व्यवहार नाही की जो असिद्धांतिक असे. अर्थात् हे 'रियल सायन्स' आहे, 'कम्प्लीट सायन्स' आहे. व्यवहाराला किंचितमात्र तिरस्कारत नाही! __ कोणाला किंचितही दुःख होणार नाही, यास शेवटची 'लाइट' म्हणावे. विरोधकाला ही शांती होईल. तुमचा विरोधकही शेवटी असे बोलेल की 'भाऊ, ह्यांच्यात आणि माझ्यात जरा मतभेद आहेत, परंतु त्यांच्यासाठी मला चांगली भावना आहे, आदर आहे! विरोध तर होतातच. विरोध तर नेहमी राहणारच आहे. ३६० डिग्रीत आणि ३५६ डिग्रीतही विरोध होतोच! तसेच ह्या सर्वांत सुद्धा विरोध तर होतोच. एकाच डिग्रीवर सर्व मनुष्य येऊ शकत नाहीत. एकाच विचारणसरणी वर सर्व मनुष्य नाही येऊ शकत. कारण की मनुष्याच्या विचारसरणीच्या चौदा लाख योनी आहेत. सांगा आता, आपल्याला किती एडजस्ट होऊ शकतील? अमुकच योनी एडजस्ट होऊ शकतात, सर्व नाही होऊ शकणार! ___ घरातील आपला व्यवहार सुंदर करायला हवा. पत्नीला मनापासून असे वाटू लागेल की असे (उत्तम) पती कधीच मिळणार नाहीत. आणि पतीला सुद्धा मनापासून असे वाटेल की अशी (उत्तम) पत्नी कधीच मिळणार नाही असा हिशोब जर जुळवून आणला तर मग आपण समजावे की आपण खरे ठरलो! प्रश्नकर्ता : आपल्या आध्यात्मिक गोष्टी तर एवढ्या उत्कृट आहेत की त्याय काही बोलाण्यासारखे नाहीच पण व्यवहारात सुद्धा आपले बोलणे अगदी 'टॉप' चे आहे. दादाश्री : असे आहे ना, की टॉपचा व्यवहार समजल्याशिवाय कोणी मोक्षाला गेले नाही. हवे तितके, बारा लाखाचे आत्मज्ञान असो, परंतु व्यवहार समजल्याशिवाय कोणीही मोक्षाला गेले नाहीत! कारण की व्यवहारच सोडवणारा आहे ना? व्यवहाराने तुम्हाला सोडले नाही तर तुम्ही काय कराल? तुम्ही 'शुद्धात्मा' आहातच, पण व्यवहार सोडेल तेव्हा ना? तुम्ही व्यवहाराचीच गुंतागुंती करत राहता न. त्याचा झटपट निवाडा आणा ना! जय सच्चिदानंद

Loading...

Page Navigation
1 ... 121 122 123 124 125 126