________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
४५
दादाश्री : एवढ्याने निकाल होणार नाही. निकाल अर्थात् समोरच्याला फोन केला पाहिजे. त्याच्या आत्म्याला कळवावे लागेल. त्या आत्म्याकडे, आपली चुक झाली आहे असे कबुल करावे लागेल. अर्थात् खूप मोठे प्रतिक्रमण करावे लागेल.
प्रश्नकर्ता : कोणी आपला अपमान केला, तरीही आपल्याला त्याचे प्रतिक्रमण करावे लागेल?
दादाश्री : मान देणार तेव्हा नाही करायचे, अपमान करेल तरच प्रतिक्रमण करायचे आहे, प्रतिक्रमण केल्याने आपल्याला अपमान करणाऱ्यावर द्वेष होतच नाही, एवढेच नाही, तर त्याच्यावर चांगला परिणामही होणार, अर्थात त्यालाही आपल्यावर द्वेषभाव भाव होणार नाही, ही तर झाली पहिली स्टेप, पण त्यानंतर त्याला बातमी सुद्धा पोहचते.
प्रश्नकर्ता : त्याच्या आत्माला बातमी पोहचते का?
दादाश्री : हो, जरुर पोहचते. मग तो आत्मा त्याच्या पुद्गलला सुद्धा कळवतो की, 'भाऊ, तुझ्यासाठी फोन आला आहे.' आपले हे प्रतिक्रमण, अतिक्रमणासाठी आहे, क्रमणासाठी नाही.
प्रश्नकर्ता : खूप प्रतिक्रमण करावे लागतील?
दादाश्री : जितक्या स्पीडने आपल्याला घर बांधायचे आहे, तितके कामगार आपल्याला वाढवावे लागतील. त्याचे असे आहे की, बाहेरच्या लोकांचे प्रतिक्रमण नाही केले तरी चालेल, पण आपल्या आजू-बाजूचे आणि घरातील जवळच्या व्यक्तींचे प्रतिक्रमण खूप करावे लागतील. घरातल्या लोकांसाठी मनात अशी भावना ठेवा की, एकाच घरात जन्मलो, एकत्र रहातो, तर या सर्वांनाही कधीतरी मोक्ष मार्गावर यावे.
__ एक भाऊ माझ्याकडे आले होते. ते मला सांगू लागले, 'दादा, मी लग्न तर केले, पण मला माझी बायको आवडत नाही.' मी म्हणालो, 'का बरे? न आवडण्याचे काय कारण आहे?' तेव्हा तो म्हणाला, 'ती जरा लंगडी आहे, लंगडते.' 'तर मग तुझ्या बायकोला तू आवडतोस की नाही?' तेव्हा तो म्हणाला, 'दादा, मी तर आवडेल असाच आहे ना ! मी देखणा आहे,