________________
७२
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
दादाश्री : त्रागा तर स्त्रिया नाही, पुरुषही करतात.
आता तर जास्त त्रागा नाही करत. त्रागा म्हणजे काय? स्वत:ला काही हवे असेल तर समोरच्याला धमकावून उपभोगुन घेतात. स्वत:चे खरे करतात, मनमानी करतात!
प्रश्नकर्ता : सगळीकडे बायकांचाच दोष का पाहिला जातो आणि पुरुषांचा का नाही पाहिला जात.
दादाश्री : स्त्रियांचे तर असे आहे की, पुरुषांच्या हातात कायदा होता, म्हणून स्त्रियांचे नुकसान झाले आहे.
हे सर्व पुस्तक तर पुरुषांनी लिहिले आहे, म्हणून पुरुषांनाच पुढे ठेवले आहे, स्त्रियांना हटवून दिले आहे. त्यात तर ह्या लोकांनी स्त्रियांची वेल्यूच नाहीशी केली आहे. आता मार पण तितकाच खात आहेत, नरकात ही तेच जातात, इथूनच नरकात जातात. स्त्रियांमध्ये असे नाही. भले स्त्रीची प्रकृती वेगळी आहे पण तिच्या प्रकृती प्रमाणे तसेही फळ मिळते आणि हे सुद्धा फळ मिळते, स्त्रीची अजागृत प्रकृती आहे. अजागृत म्हणजे सहज प्रकृती.
प्रश्नकर्ता : कुठपर्यंत आम्ही असे सहन करावे? दादाश्री : सहन केल्यामुळे तर खूप शक्ति वाढते. प्रश्नकर्ता : म्हणजे असे सहनच करत रहायचे?
दादाश्री : सहन करण्यापेक्षा त्यावर विचार करणे चांगले. विचार करुन त्याचे सोल्युशन (उपाय) काढा. बाकी सहन करणे हा गुन्हा आहे. सहनशीलता खूप झाली की मग स्प्रिंगसारखी उसळेल आणि सर्व घर सैरावैरा करुन सोडते. सहनशीलता तर स्प्रिंग आहे. स्प्रिंगवर कधीही लोड (दबाव) ठेवू नये. थोड्यावेळा पुरते ठिक आहे. रस्त्याने जाता-येता जर कोणासोबत काही झाले तर तेव्हा ही स्प्रिंग वापरावी. इथे घरातल्या लोकांवर लोड ठेवायचा नाही. घरच्या माणसांचे सहन केले तर काय होईल. तर ती स्प्रिंग उडेल.
प्रश्नकर्ता : सहनशीलतेची लिमिट किती ठेवावी?