________________
पति- पत्नीचा दिव्य व्यवहार
का ? बोलतात ना की बायकोच्या पुण्याने ही लक्ष्मी आहे आणि सर्व ठीक चालले आहे, असे खरेच असते का ?
१०४
दादाश्री : ते तर कोणी आपल्या पत्नीला मारत असेल तर त्याला समजवण्यासाठी आपले लोक असे म्हणतात की, अरे मुर्खा, ह्या तुझ्या बायकोचे नसीब तर बघ ! कशाला ओरडतोस ? तिचे पुण्य आहे म्हणून तर तू खातो-पितो आहेस, अशाप्रकारे हे सुरु झाले. सर्व जीव स्वत:च्या पुण्याचेच खातात. तुम्हाला समजले ना ! हे तर असे सर्व बोलले पाहिजे तरच ते सरळ वागतील ना! सर्व आपापल्या पुण्याचेच उपभोगत आहेत आणि स्वत:चे पाप देखील स्वतःच भोगत आहेत. ह्यात कोणाचे काहीही देणेघेणे नाही. किंचित, एका केसा इतकी सुद्धा भानगड नाही.
प्रश्नकर्ता : कोणी शुभ कार्य करतो, उदारणार्थ, पुरुष दान करतो आणि त्यात पत्नीचे सुद्धा सहकार्य असते, तर त्याचे फळ दोघांना मिळेल ?
दादाश्री : जरुर. करणारा आणि सहकार्य देणारा म्हणजे करविणारा अथवा कर्ता प्रत्ये अनुमोदना करणारा म्हणजे तिघांनाही, करणारा, करविणारा आणि कर्ता प्रत्ये अनुमोदना, करणारा ह्या सर्वांना पुण्य मिळते. तुम्ही ज्यांना सांगितले असेल की हे करा, हे करण्यायोग्य आहे त्याला करविणारा म्हणायचे, तुम्हाला करणारा म्हटले जाते आणि पत्नी विरोध नाही करत, तर तिला अनुमोदना करणारी म्हटले जाते. सर्वांना पुण्य मिळते. परंतु करणाऱ्याच्या हिस्यात पन्नास टक्के आणि उरलेले पन्नास टक्के त्या दोघांमध्ये वाटले जातात.
प्रश्नकर्ता: पूर्वजन्माच्या ऋणानुबंधातून सुटण्यासाठी काय केले पाहिजे ?
दादाश्री : ज्यांच्याशी आपले पूर्वीचे ऋणानुबंध आहेत आणि ती व्यक्ती आपल्याला आवडतच नसेल, त्याचा सहवास देखील आवडत नसेल आणि कर्तव्य म्हणून त्याच्यासोबत रहावेच लागत असेल तेव्हा काय करावे! तर त्याच्यासोबत बाहेरचा व्यवहार जरुर करायचा पण आतून त्याचे प्रतिक्रमण करत रहायचे. कारण आपण मागच्या जन्मात अतिक्रमण केले होते त्याचा हा परिणाम आहे. कॉझीस काय केले होते ? तर म्हणे,