Book Title: Pati Patnicha Divya Vyavhar
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 113
________________ पति - पत्नीचा दिव्य व्यवहार की, 'नाही, आज मला नाटक पहायला जायचे आहे.' अर्थात् टाईमिंग जुळत नाहीत. जर एक्जेक्ट टाईमिंगला टाईमिंग जुळत असेल तरच लग्न कर. १०० ह्या अवलंबनाचे जितके सुख आपण घेतले ते सर्व उधार घेतलेले सुख आहे. लोन वर. आणि लोन म्हणजे 'री पे' (परतफेड) करावे लागते. तुम्ही आत्म्याचे सुख उपभोगत नाही आणि पुद्गलजवळ सुख मागता. आत्म्याचे सुख असेल तर काही हरकतच नाही, पण पुद्गलकडे भीख मागितली, ती परत फेडावी लागेल. हे लोन आहे. जितके गोड वाटले असेल, तितकेच त्यातून कडूपणा भोगावे लागेल. कारण पुद्गलकडून लोन घेतले आहे. म्हणून त्याला परतफेड करते वेळी तितकेच कडू वाटेल. पुद्गलकडून घेतले म्हणून पुद्गललाच 'री पे' करावे लागेल. आता तर आपले कित्येक महात्मा येऊन सांगतात की, 'विषय सुखासाठी आम्हला विनवण्या करायला लावते.' तेव्हा मी म्हणालो, 'तुझा प्रभाव पडत नाही म्हणूनच ती असे करायला लावते ना! आता तरी समज ना, आता तरी योगी हो !' आता ह्या वावटळातून कसे बाहेर पडायचे ? ह्या दुनियेच्या वावटळातून बाहेर पडता येईल ? ! एक बाई आपल्या पतीला चार वेळा साष्टांग नमस्कार करायला लावते, तेव्हा कुठे एक वेळा स्पर्श करु देते. अरे मुर्खा ! ह्या ऐवजी समाधी घेतली असती तर काय वाईट झाले असते ? ! समुद्रात समाधी घे, तो समुद्र तरी सरळ आहे! मग भानगडच नाही ना! विषयसुखासाठी चार वेळा साष्टांग ! प्रश्नकर्ता : गेल्या जन्मी आम्ही तिच्याशी संघर्ष (भांडण, क्लेश) केला असेल, तेव्हा आता ह्या जन्मात ती आमच्याशी संघर्ष करते. पण ह्याचा काही मार्ग तर काढावा लागेल ना ? सोल्युशन तर शोधावे लागेल ना ? दादाश्री : ह्याचे सोल्युशन तर आहे, पण लोकांचे मनोबळ कच्चे आहे ना !

Loading...

Page Navigation
1 ... 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126