________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
भगवानांच्या काळात ब्रह्मचर्यचे जे फळ मिळत होते तेच फळ आजही मिळेल याची आम्ही गॅरेंटी देतो!
प्रश्नकर्ता : एक पत्नीव्रत म्हटले ते सूक्ष्मपणे की फक्त स्थूल? मन तर जाणारच ना?
दादाश्री : सूक्ष्म सुद्धा असायला हवे आणि जर मन भटकत असेल तर मनापासून वेगळे रहायला हवे आणि त्याचे सतत प्रतिक्रमण करत रहावे लागेल. मोक्षाला जाण्याची लिमिट कोणती? तर एक पत्नीव्रत आणि एक पतीव्रत.
जर तू संसारी आहेस तर तुझ्या हक्काचे विषय तू भोग, परंतु बिनहक्काचे विषय तर भोगूच नकोस कारण त्याचे फळ भयंकर आहे.
हक्काचे सोडून दुसऱ्या जागी विषयभोग झाला तर, ती स्त्री जिथे जिथे जाईल तिथे तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. ती अधोगतीत जाईल तर तुम्हालाही तिथे जावे लागेल.
आज-काल बाहेर सर्व असेच चालू आहे. कुठे जन्म होईल याचा काही नेम नाही. बिनहक्काचे विषय ज्याने भोगले त्याला तर भयंकर यातना भोगावी लागते. एखाद्या जन्मी त्याची मुलगी देखील चारित्र्यहीन बनते. नियम असा आहे की जिच्या बरोबर बिनहक्काचा विषय भोगला असेल तीच आई किंवा मुलगी बनून येते. बिनहक्काचे भोगले तेव्हापासूनच मनुष्यपण निघून जाते. बिनहक्काचा विषय तर भंयकर गुन्हा आहे. स्वतः दुसऱ्यांचे भोगले तर स्वत:च्या मुलींना इतर भोगतील. परंतु त्याची चिंताच करत नाही ना!
बिनहक्काच्या विषयविकारात नेहमी कषाय असतात, आणि कषाय असल्यामुळे नरकात जावे लागते. पण लोकांना हे माहितच नसते! म्हणून तर घाबरत नाही, कुठल्याही प्रकारची भीती देखील वाटत नाही. आजचा मनुष्य जन्म, हा तर मागच्या जन्मात काही चांगले केले त्याचे फळ आहे.
विषयविकार आसक्तीमुळे उत्पन्न होतात आणि त्यातून मग विकर्षण होतो. विकर्षण झाले तर त्यातून वैर बांधले जाते आणि वैरच्या 'फाउन्डेशन' वर हे जगत उभे आहे.