________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
दादाश्री : ती त्यांना परमेश्वर म्हणेल पण त्यांना मरण येणार नसेल तर ते परमेश्वर. मरण येणार असेल तर कसले परमेश्वर ? ! पती परमेश्वर कसे असणार?! ह्याकाळातील पती परमेश्वर असू शकतात का ?
प्रश्नकर्ता : मी तर रोज नवऱ्याच्या पाया पडते.
७७
दादाश्री : असे करुन फसवत असेल नवऱ्याला. असे पाया पडून नवऱ्याला फसवतात. पती म्हणजे पती आणि परमेश्वर म्हणजे परमेश्वर. हे पती तरी कुठे बोलतात की, 'मी परमेश्वर आहे!' 'मी तर पती ( मालक, धनी) आहे.' एवढेच म्हणतात ना ?
प्रश्नकर्ता : हो, 'मालक आहे' असेच बोलतो.
दादाश्री : हं.... असे तर गायीचे पण मालक आहेत, सगळ्यांचे मालक आहेत. फक्त आत्माच परमेश्वर आहे, शुद्धात्मा.
प्रश्नकर्ता : चरणामृत पिवू शकतो का ?
दादाश्री : आजच्या ह्या, दुर्गंधी सुटलेल्या माणसांचे चरणामृत कसे पिऊ शकता? ह्या माणसांची दुर्गंधी येते, असे बसले असतील तरी दुर्गंधी येते. पूर्वीचे लोक सुगंधवाले होते, तेव्हाची गोष्ट निराळी होती. आता तर सर्व लोकांना दुर्गंध येतो. आपले डोके देखील दुखू लागते. जसे-तसे करुन दिखावा करायचा की आम्ही नवरा-बायको आहोत.
प्रश्नकर्ता : आता तर सर्वांनी ते शब्द खोडून टाकले आहे, दादा. आता सर्व बायका शिकल्या-सवरल्या ना, म्हणून सर्वांनी हे परमेश्वर पद रद्द करुन टाकले आहे.
दादाश्री : पती परमेश्वर बनून बसले आहेत, बघा ना! ह्यांच्याच हातात पुस्तक लिहिण्याची सत्ता, म्हणून मग त्यांना कोण बोलणारा ! एकपक्षी करुन टाकले ना? असे झाले नाही पाहिजे.
प्रश्नकर्ता : पूर्वीच्या बायकांप्रमाणे, आजकालच्या बायका आपल्या नवऱ्याला मान देत नाहीत.
दादाश्री : हो, आधीचे पती 'राम' होते आणि आत्ताचे ‘मरा’ आहेत.