________________
५६
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
दादाश्री : हो, हीराबांना मी अजूनही सांगतो ना !
हो। मी सुद्धा, ह्या वयातही हीराबांना असे सांगतो की 'मी तुमच्याशिवाय बाहेरगावी जातो ते मलाही आवडत नाही.' त्या मनात विचार करतात, की मला तर आवडते तर मग ह्यांना का आवडत नसेल? पण मी असे म्हटले तर संसार विस्कटणार नाही. तात्पर्य हेच की आता तू इथून तृप ओत ना बाबा! नाही ओतले तर शुष्कपणा येईल! ओत ना सुंदर भाव! मी कधी बसलो असेल तेव्हा हीराबा मला विचारतात, तुम्हाला माझी सुद्धा आठवण येते? मी म्हणतो नेहमीच येते, जिथे इतर लोक आठवतात तर तिथे तुमची आठवण का नाही येणार? आणि खरोखर आठवण येतही असते, येत नाही असे नाही.
आमची लाईफ आदर्श आहे, हीराबाही म्हणतात, 'तुम्ही लवकर या.' स्त्रीचा पती झालो केव्हा समजावे तर जेव्हा स्त्री पतीसाठी निरंतर पूज्यभाव अनुभवत असेल तेव्हा! पती तर कसा असावा? कधीही स्त्रीला, मुलांना कुठलीही हरकत येऊ देणार नाही, असा असावा. आणि स्त्री कशी असावी? कधीही पतीला अडचणीत टाकणार नाही आणि त्याच्याच विचारात जगणारी.
१७. पत्नीसोबत भांडण दोघेजण तुफान-मस्ती करत असतील, ते लढतील-भांडतील पण आत (मनात) दावा नाही मांडणार. आणि आपण जर मध्ये पडलो तर ते आपल्याकडून स्वत:चे काम करवून घेतील आणि ते दोघे पुन्हा एकच होतील. दुसऱ्या घरी रहायला नाही जात याला पोपटमस्ती म्हणतात, आम्ही लगेच समजून जातो ह्या दोघांनी पोपटमस्ती सुरु केली आहे.
एक तास नोकराला, मुलांना किंवा बायकोला खूप धमकावले असेल तर मग ते पुढच्या जन्मी पती बनून किंवा सासू होऊन तुम्हाला आयुष्यभर पायाखाली तुडवतील! न्याय तर असायला हवा की नाही? हेच भोगायचे आहे. तुम्ही कोणाला दुःख द्याल तर आयुष्यभर तुम्हालाही दुःखच मिळेल. एकच तास जरी दुःख दिले तरी त्याचे फळ आयुष्यभर भोगावे लागेल. नंतर मग बोलाल की 'बायको माझ्याबरोबर अशी का