________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
ज्यावेळी जे गरजेचे असेल तसे, म्हणजे दररोज फक्त सक्तीने वागले नाही पाहिजे, तर एका डोळ्यात सक्ती आणि दुसऱ्या डोळ्यात देवी प्रमाणे असे मानले पाहिजे, समजले ना?
प्रश्नकर्ता : एका डोळ्यात सक्ती आणि दुसऱ्या डोळ्यात देवी, हे दोन्ही ऐट ये टाईम (एकाच वेळी) कसे राहू शकते?
दादाश्री : पुरुषांना तर असे सर्व येते. मी तीस-पस्तीस वर्षाचा होतो. त्यावेळी मी जेव्हा घरी यायचो तेव्हा हीराबा एकटयाच नाही, तर आजूबाजूच्या सर्व स्त्रिया माझ्या एका डोळ्यात सक्ती आणि दुसऱ्या डोळ्यात पूज्यता पाहत असत. सर्व स्त्रिया डोक्यावर पदर घेऊन बसत आणि लगेच सर्तक होत असत. आणि हीराबा तर घरात प्रवेश करण्या आधीच धस्स होऊन जात असत. बुटांची चाहूल लागल्यावर घाबरुन जात, एका डोळ्यात सक्ती, आणि एका डोळ्यात नरमाई. ह्याशिवाय स्त्रीला सांभाळताच येणार नाही. म्हणून हीराबा सांगत असे ना, 'दादा कसे आहेत?'
प्रश्नकर्ता : तिखट भोवऱ्यासारखे.
दादाश्री : तिखट भोवऱ्यासारखे कायम राहत होतो. तसे त्यांना कधीही घाबरवत नव्हतो. घरात आलो... की चूप, सर्व बर्फासारखे थंडगार होऊन जात असे. बुटांची चाहूल लागली की लगेचच!
सक्ती कशासाठी तर त्यांना कुठे ठोकर लागू नये, म्हणून सख्ती ठेवा. त्यासाठी एका डोळ्यात सक्ती आणि एका डोळयात प्रेम ठेवावे.
प्रश्नकर्ता : म्हणून संस्कृत मध्ये म्हटले आहे, 'यत्र नार्यस्तु पुज्यंते रमंते तत्र देवता!'
दादाश्री : हो, बस! म्हणून मी जेव्हा असे बोलतो ना, तेव्हा सर्व लोकं म्हणतात की, दादा तुम्ही स्त्रियांची बाजू घेता. पक्षपाती आहात?
परंतु मी काय सांगतो की, स्त्रियांना पूजा, याचा अर्थ असा नाही की सकाळी उठून त्यांची आरती करावी, असे कराल तर ती तुमचे चांगलेच तेल काढेल. याचा अर्थ काय ? एका डोळ्यात प्रेम आणि एका डोळ्यात सक्ती ठेवा.