________________
५४
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
म्हणून लोकांच्या मनात असे आले की, हा 'नवीन' वर तयार झाला. पुन्हा लग्न लावा. मुलीही पुष्कळ होत्या ना! आणि मुलींच्या आईवडिलांची इच्छा पण अशी की, कसेही करुन, विहिरीत ढकलूनही मुलींचा निवाडा करा, तेव्हा भादरण गावचे एक पाटील आले. त्यांच्या मेव्हण्यांची मुलगी असेल. म्हणून आले होते. मी विचारले, 'काय काम आहे आपले?' तेव्हा ते म्हणाले, 'आपल्या सोबत असे घडले?' त्यावेळी १९४४ मध्ये माझे वय ३६ वर्ष होते. तेव्हा मी म्हणालो, 'तुम्ही हे विचारायला आलात का?' तेव्हा ते म्हणाले, 'एक तर हीराबांचा डोळा गेला, आणि दुसरे असे की प्रजा (मुलं) ही नाही.' मी म्हणालो, 'प्रजा नाही पण माझ्याजवळ कोणते स्टेटही (राज्य) नाही. बडोदा स्टेट नाही की मला त्यांना द्यायचे आहे. स्टेट असते तर मुलांना दिलेले बरे. पण हे तर माझ्याकडे एखादे घर किंवा थोडीशी जमीन असेल. पण ते ही परत आपल्याला शेतकरीच बनवणार ना !' जर स्टेट असते तर समजा की ठीक होते. मग मी त्यांना विचारले की, आता हे सर्व तुम्ही कशाला विचारत आहात? लग्न केले तेव्हा आम्ही तर हीराबांना प्रोमिस दिले आहे. तर मग एक डोळा गेला म्हणून काय झाले ! दोन्ही गेले तरी मी त्यांना हात धरुन चालवेन.
प्रश्नकर्ता : माझे लग्न झाल्यानंतर आम्ही दोघे एकमेकांना ओळखू लागलो आणि आता असे वाटते की निवडण्यात आमची चुक झाली, दोघांच्याही स्वभावात काही मेळ बसत नाही. तर दोघांचा मेळ बसेल असे कसे आणि कश्याप्रकारे करावे जेणे करुन सुखी होता येईल?
दादाश्री : हे जे काही तुम्ही बोलत आहात ना, त्यातले एकही वाक्य सत्य नाही. पहिले वाक्य, लग्न झाल्यानंतर दोन्ही व्यक्ति एकमेकांना ओळखू लागतात, पण खरे तर जरा सुद्धा ओळखत नाही. जर ओळखत असते तर ही भानगडच उभी राहीली नसती ना! अर्थात अजिबात ओळखत नाही.
मी तर फक्त बद्धिच्या 'डिविजनने'(विभाजनाने) सर्व मतभेद संपवून टाकले होते. पण हीराबांची ओळख मला केव्हा झाली? वयाच्या साठव्या वर्षी मला हीराबांची खरी ओळख पटली ! १५ वर्षाचा होतो तेव्हा लग्न केले, ४५ वर्षापर्यंत सातत्याने निरीक्षण केले, तेव्हा त्यांना ओळखले की त्या अश्या आहेत!