________________
३०
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
तर ते अहमदमिया एके दिवशी मला बोलू लागले, सेठजी, आज आमच्या घरी पाहुलं करावे. तुम्ही माझ्या घरी आलात तर माझ्या बायकोमुलांना आनंद होईल.' तेव्हा आम्हाला ज्ञान-बिन तर नव्हते पण विचार खूप सुंदर. सगळ्यांसाठी भावना होती खूप सुंदर. आपल्याकडून तो कमवत आहे तर आणखीन जास्त कसे कमवेल, अशी पण भावना होती. आणि तो दुःखातून मुक्त होऊन सुखी व्हावा अशी भावना!
मी म्हणालो, का नाही येणार? तुझ्याकडे तर हमकास येणार.' तेव्हा मिंयाभाई बोलू लागले, 'माझ्या घरी तर एकच रूम आहे, आपल्याला कुठे बसवू?' तेव्हा मी सांगितले, मी कुठेही बसेन, मला तर फक्त एक खुर्ची पाहिजे. जरी खुर्ची नसली तरी मला चालेल. तुझी इच्छा आहे, म्हणून मी नक्की येणार.' मग मी तर गेलो. आमचा कॉन्ट्रेक्टचा व्यवसाय असल्यामुळे आम्हाला मुसलमानांच्या घरी सुद्धा जावे लागत, तिथे चहा सुद्धा घेतो! आमच्यासाठी कोणी परके नाही.
मी बोललो, 'अरे, ही एकच मोठी रूम आहे आणि दुसरी तर संडासाइतकी छोटी आहे.' तेव्हा म्हणे, साहेब क्या करे? हमारे गरीब के लिए इतना बहत है.' मी विचारले, 'तुझी वाइफ कुठे झोपते?' तेव्हा म्हणाला, ह्याच रूम मध्ये, ह्याला बेडरूम म्हणा, डाइनिंग रूम म्हणा, सर्व काही हेच आहे.' मी विचारले, 'अहमदमिंया औरत के साथ कुछ झगडाबिगडा होता नही क्या?' 'हे काय बोलला?' मी विचारले, 'का?' तेव्हा तो म्हणाला, 'कधीच नाही होत. मी असा मूर्ख माणूस नाही.' परंतु मतभेद ?! तेव्हा म्हणाला, काय बोलत आहात? नाही, बायको सोबत मतभेद नाही. बायकोसोबत माझे भांडण नाही होत. मी विचारले 'कधी बायको रागावली तर' तेव्हा बोलू लागला, 'प्रिये, एक तर बाहेर साहेब हैराण करतो आणि तू सुद्धा हैराण करू लागलीस तर माझे काय होईल?' तेव्हा मग चूप होऊन जाते! मी विचारले, 'मतभेद होत नाहीत म्हणून मग काही भानगडच नाही ना?' तेव्हा बोलला, 'नाही, मतभेद झाले तर ती कुठे झोपेल आणि मी कुठे झोपणार? इथे दोन-तीन मजले असतील तर मी समजेल की तिसऱ्या मजल्यावर निघून जावे. परंतु इथे तर ह्याच रूम मध्ये झोपायचे आहे. मी ह्या बाजूला तोंड करुन झोपावे आणि तिने त्या बाजूला तोंड करुन