________________
३४
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
बाकी, ज्या तिला माहित आहेत, त्या चूका दाखवणे हा तर अपराध आहे. आपली इंडियन लोकंच चूका काढतात.
मी सांताक्रुजला तिसऱ्या मजल्यावर घरात बसलो असेल तेव्हा चहा येतो. तर एखाद्या दिवशी जरा साखर घालायला विसरले असतील, तरी पिऊन टाकतो आणि तेही दादांच्या नावांने! आतमध्ये दादांना सांगतो की चहात साखर घाला साहेब! तेव्हा दादा घालतात. अर्थात् बिनसाखरेचा चहा येतो तेव्हा पिऊन टाकतो बस. आमची काही तक्रार नसते ना! आणि मग ते साखर घेऊन धावत येतात. मी विचारले, भाऊ साखर कशाला आणलीस? ही चहाची कप-बशी घेऊन जा! तेव्हा बोलतात, चहा फिकी होती तरीही आपण साखर नाही मांगितली! मी म्हणालो 'मी कशाला सांगू? तुमच्या लक्षात येईल अशी गोष्ट आहे ही.'
___ एका माणसाला मी विचारले, घरात कधी बायकोच्या चूका काढतोस का? तेव्हा बोलला, 'ती तर आहेच चूका करणारी, त्यामुळे चूका काढाव्याच लागतात ना! बघा, हे अक्कलेचे बारदान! विकायला गेलो तर चार आने पण नाही मिळणार ह्या बारदानाचे, तरी समजतो की, माझी बायको चूका करणारी आहे, घ्या!
प्रश्नकर्ता : काहींना आपल्या चूका माहित असतात, तरीही सुधारत नाही मग?
दादाश्री : ते बोलून नाही सुधारणार. बोलण्याने तर जास्त उल्टे चालतात. तो जर कधी त्यावर विचार करत असेल तर त्यावेळी तुम्ही त्याला सांगावे की, ही चुक कशी सुधारायची! समोरासमोर बातचीत करा, फ्रेन्ड (मित्रा)सारखे. वाइफ बरोबर फ्रेन्डशिप ठेवली पाहिजे, नाही ठेवली पाहिजे ? मित्रांबरोबर अशी कटकट करतात का? त्याची चुक डायरेक्ट सांगता का? नाही ना! कारण फ्रेन्डशिप टिकवायची आहे. आणि ही तर लग्नाची, कुठे जाणार आहे ? असे आपणास शोभत नाही. जीवन बागेसारखे बनवा. घरात मतभेद व्हायला नकोत, कधीही नाही, घर बागेसारखे वाटावे. घरात ढवळाढवळ करु नका. छोट्या मुलालाही, जर त्याची चुक त्याला दिसत असेल तर दाखवायची नाही. दिसत नसेल तर चुक दाखवू शकता.