________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
सापडतो की नाही ? मग तिथून निसटून जा. असा नियम पाळला पाहिजे की, कोणासोबतही संघर्षात पडायचे नाही.
१०. दोन डिपार्टमेन्ट वेगळे
३९
पुरुषांनी स्त्रियांच्या बाबतीत हस्तक्षेप केले नाही पाहिजे आणि स्त्रियांनीही पुरुषांच्या बाबतीत हस्तक्षेप नाही केले पाहिजे. प्रत्येकांनी आपापल्या डिपार्टमेन्ट मध्ये राहिले पाहिजे.
प्रश्नकर्ता : स्त्रियांचे डिपार्टमेन्ट कोणते ? कोणत्या कोणत्या बाबतीत पुरुषांनी हस्तक्षेप करू नये.
दादाश्री : असे आहे की, जेवण काय बनवावे, घर कसे चालवावे, हे सर्व स्त्रियांचे डिपार्टमेन्ट आहेत. ती गहू कुठून आणते, कुठून आणत नाही हे आपल्याला जाणून घेण्याची काय गरज आहे ? ती जर तुम्हाला सांगेल की गहू आणायला त्रास होत आहे तर ती गोष्ट वेगळी आहे. परंतु ती आपणास सांगत नसेल, राशन दाखवत नसेल, तर आपल्याला तिच्या डिपार्टमेन्ट मध्ये ढवळाढवळ करण्याची गरजच काय आहे ? आज खीर बनव, आज जिलेबी बनव, हे ही आपल्याला सांगण्याची काय गरज आहे ? टाईम येईल तेव्हा ती बनवून वाढेल.
त्यांचा 'डिपार्टमेन्ट' त्यांच्यासाठी स्वतंत्र आहे ! त्यातून कधी खूप इच्छा झाली तर सांगा, 'आज लाडू बनवा. ' सांगण्यास मनाई नाही, पण विनाकारण अशी - तशी बोंबाबोंम करता की, कढी खारट झाली, खारट झाली, ह्या सर्व निरर्थक गोष्टी आहेत.
जो पुरुष घरातल्या भानगडीत हात घालत नाही, त्याला खरा पुरुष म्हणतात. अन्यथा तो स्त्री सारखाच असतो. काही पुरुष तर ( स्वयंपाक) घरात जाऊन मसाल्याचे डब्बे तपासतात, की ' हे दोन महिन्यापूर्वी आणले होते, आणि इतक्या लवकर संपले, अरे, असे सर्व पाहतोस, तर कसे पार पडेल ? ज्यांचे हे ‘डिपार्टमेन्ट' आहे, त्यांना चिंता नसेल ? कारण वस्तू तर वापरल्या जातात आणि नवीन आणल्याही जातात. पण हा तर विनाकारण अति शहाणा बनायला जातो. त्यांच्या स्वयंपाकघराचे डिपार्टमेन्टमध्ये हात घालू नये.