________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
३३
दादाश्री : नाही, नाही, वाईट नाही वाटत. आपण चुक नाही दाखवली तर, ती बोलेल, 'कढी खारट होती, तरीही नाही सांगितले.' तेव्हा तुम्ही सांगा, 'तुला माहित पडेल ना, मी कशाला सांगू.' परंतु हे तर कढी खारट झाली तर तोंड वाकडे करतात, 'कढी खारट आहे !' अरे! कसा माणूस आहेस? ह्याला पती म्हणून कसे ठेवावे? अश्या पतीला बाहेर काढून टाकले पाहिजे. असा दुर्बळ पती! अरे पत्नीला समजत नाही का की तुम्ही तिला समजवयाला निघाला आहात? तिच्याबरोबर डोकेफोडी करता! मग तिच्या हृदयावर घाव पडणार ना! मनात बोलेल, 'हे काय मला समजत नाही ? हे तर माझ्यावर तीर सोडत आहेत. हा काळमुखा तर दररोज माझ्या चूकाच काढत राहतो.' आपली लोकं जाणून-बुझून चूका काढत असतात. आणि त्यामुळे संसार जास्तच बिघडत जातो. काय वाटते आपल्याला? तर मग आपण थोडा विचार केला तर काय हरकत आहे ?
प्रश्नकर्ता : आपण चूका दाखवल्या तर पुन्हा त्याच चूका होणार नाहीत ना?
दादाश्री : ओहोहो, अर्थात् शिकवण देण्यासाठी! हो, तर मग चुक काढण्यास हरकत नाही, मी तुम्हाला सांगतो की चूका काढा, पण ती त्यासाठी तुमचे उपकार मानत असेल तर चूका काढा. ती बोलेल बरे झाले तुम्ही माझी चुक दाखवलीत. मला तर माहितच नव्हते. असे तुम्ही उपकार मानता? ताई, तुम्ही ह्यांचे उपकार मानता का?
प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : तर मग ह्याचा अर्थच काय? ज्या चूका तिला माहित आहेत, त्या सांगण्यात काही अर्थ आहे का? त्यांना स्त्रिया काळमुखा बोलतात, की जेव्हा बघावे तेव्हा बोलत राहतो. ज्या चूका तिला माहित आहेत, त्या चूका आपण दाखवू नये. इतर काहीही हो, कढी खारट झाली असो, किंवा भाजी बिघडली असो, पण जेव्हा ती खाणार तेव्हा तिला कळणार की नाही? तर मग आपल्याला सांगण्याची गरज नाही! पण जी चुक तिला माहित नसेल, ती आपण तिला सांगितली तर ती उपकार मानेल.