________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
जो वादविवाद (संघर्ष) होतो त्यास क्लेश बोलतात. मन दुखावले गेल्यामुळे एकमेकांशी थोडा वेळ वेगळे राहतात, त्याचे नांव क्लेश. दोन-तीन तास वादविवाद झाल्यावर लगेच एक व्हाल तर हरकत नाही. पण संघर्ष झाल्यावर वेगळे व्हाल तर तो क्लेश म्हटला जाईल. बारा तास वेगळे राहिलात तर पूर्ण रात्र क्लेशातच जाईल.
प्रश्नकर्ता : हं...... ही क्लेशची गोष्ट केली ती पुरुषांमध्ये जास्त आहे की स्त्रियांमध्ये जास्त आहे?
दादाश्री : क्लेश तर... स्त्रियांमध्ये जास्त असतो. प्रश्नकर्ता : ह्याचे कारण काय?
दादाश्री : असे आहे ना, काहीवेळा वादाविवाद होतो त्यामुळे तेव्हा क्लेश निर्माण होतो. क्लेश होणे म्हणजे पटकन जळून विझून जाणे. पुरुष आणि स्त्रीमध्ये क्लेश झाल्यावर पुरुष तर सोडून देणार पण स्त्री त्याला पटकन सोडत नाही आणि क्लेशातून कलह करुन टाकते आणि मग ती तोंड फुगवून फिरत रहाते जसे की आपण तिला तीन दिवस उपाशी ठेवल्या प्रमाणे वागते.
प्रश्नकर्ता : तर मग हा कलह दूर करण्यासाठी काय करावे?
दादाश्री : आपण क्लेश नाही केले तर कलह होणार नाही, वास्तवात आपणच क्लेश करुन आग लावत असतो. आज जेवण चांगले नाही झाले, आज तर माझ्या तोंडाची चवच गेली, असे काहीतरी बोलून क्लेश उभा करता आणि मग ती कलह करते.
प्रश्नकर्ता : मुख्य गोष्ट तर ही आहे की घरात शांती रहायला हवी.
दादाश्री : पण शांती राहिल कशी? मुलीचे नांव जरी शांति ठेवले तरी पण शांती राहणार नाही. त्यासाठी तर धर्म समजावा लागेल, घरातल्या सगळ्या सदस्यांना सांगितले पाहिजे की, आपण सर्व घरातली माणसे कोणी कोणाचे वैरी नाही. कोणाचे कोणा बरोबर भांडण नाही. आपल्याला मतभेद करण्याची काहीच गरज नाही. मिळून-मिसळून शांतीपूर्वक खा-प्या आनंदी