________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
पण आहे. हे आपण असे केले तर असे आणि असे नाही केले तर काही ही नाही, काही घेणे-देणे नाही. मतभेद ही तर केवढी मोठी निर्बलता आहे.
प्रश्नकर्ता : पण घरात मतभेद तर होतच असतात, हा तर संसार आहे ना!
दादाश्री : आपली लोक तर बस, रोज भांडणे होत असतील तरी म्हणतात, हे तर चालायचेच! पण अश्याने डेवलपमेन्ट (प्रगती) होत नाही. कशाने होते? कशाने होते? असे का बोलतात. काय होत आहे ? हे सर्व शोधून काढायला हवे.
काही वेळा घरात जर मतभेद झाले तर कोणते औषध लावता? औषधाची बाटली ठेवली आहे का?
प्रश्नकर्ता : मतभेदाचे काही औषध नाही.
दादाश्री : अरे, काय बोलता? मग तुम्ही ह्या रुममध्ये बोलत नाही, पत्नी त्या रुममध्ये बोलत नाही, तर असे अबोला ठेवून झोपून रहायचे ? औषध लावल्या शिवायच? मग हे कश्या पद्धतीने मिटत असेल ? घाव भरत असतील का? मला हे सांगा की औषध लावल्याशिवाय घाव बरे कसे होणार? सकाळपर्यंत सुद्धा हे घाव बरे होत नसतात. सकाळी चहाचा कप ठेवताना असे जोराने आपटेल. तेव्हा तुम्हीही समजाल की रात्रीचा घाव अजूनही भरलेला नाही. होते की नाही होत असे ? तशी ही गोष्ट काही आपल्या अनुभवाबाहेरची नाहीच आहे? आपण सर्वे सारखेच आहोत! अर्थात् असे का झाले की अजूनपर्यंत मतभेदाचे घाव तसेच पडले आहेत.
पण रोजच्या रोज हा घाव तसाच रहातो. खाच पडल्यामुळे घाव जात नाही ना, घाव पडलेला तर राहतोच ना! म्हणूनच खाच पडू देऊ नये. कारण की आता आपण खाच पाडली (त्रास दिला) असेल ना, तर म्हातारपणी बायको आपल्याला खाच पाडेल! आता मनातल्या मनात म्हणेल की तो बलवान आहे म्हणून काही काळापर्यंत चालवून घेईल. नंतर तिची वेळ आली की आपल्याला चांगल्याप्रकारे समजावून देईल. त्याकरता व्यवहार असा ठेवा की ती आपल्याला प्रेम करेल. आपणही तिच्यावर प्रेम करावे.