________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
६२
*
*
*
*
* पाययकुसुमावली
यायाकरकुलातील कविराज राजशेखर या इ. स. ८८४ ते ९६०च्या दरम्यान होऊन गेला. तौ महेंद्रपालराजाच्या पदरी असून ‘सर्व भाषाचतुर' होता. त्याने काव्य, नाटय, शास्त्रांचा अभ्यास केला होता. चाहुआण घराण्यातील अवंतीसुंदरी त्याची पत्नी होती. त्याने सहा प्रबंध (अनुपलब्ध) तसेच बालरामायण, बालभारत (किंवा प्रचंड पांडव) व विद्धशालभंजिका ही नाटके, कर्पूरमंजरी हे प्राकृतातील सट्टक आणि काव्यमीमांसा हा काव्य शास्त्रावरील ग्रंय अशी विपुल रचना केली. त्याचे कर्पूरमंजरी सट्टक समोर ठेवूनच नयचंद्राने रंभामंजरी, रुद्रदासाने चद्रलेखा, मार्कंडेयाने विलासवती, विश्वेश्वराने शृंगारमंजरी आणि घनश्यामाने आनंदसुंदरी सट्टकाची रचना केली. येथे दुस या जवनिकेत विचक्षणा दासी नायिका कर्पूरमंजरीचे विरहाकुल प्रेमपत्र राजाकडे घेऊन येते. नंतर राजा तिला विचारतो, 'विभ्रमलेखागणीने कर्ष मंजरीला अंतःपुरात नेल्यावर काय केले ? तेव्हा तिचा कसा साजशृंगार केला हे विचक्षणा सांगते आणि त्यावर राजा रसिकतेने मोहक कल्पना करतो. यथे कविराज राजशेखराचे काव्यकौशल्य दिसून येते. यातील भाषा महाराष्ट्री आहे.)
राजा अध अंतेउरं णइअ देवीए कि किदं तिस्सा। विचक्षणा-देव, मज्जिदा टिक्किदा भूसिदा तोसिदा अ। राजा- कधं वि।
विचक्षणा
___ घणमुवट्टिअमंगं कुंकुभरसपंकपिंजरं तिरसा ।
राजा
रोसाणिअ फुडं ता कंचणपंचालिआरूवं ।।१।।
For Private And Personal Use Only