________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१४. दोनही कानांवर (हात) ठेवून रस्लमवापुत्र (रावण) असे
म्हणाला, 'रूपवती असलेल्याही वेश्या आणि परस्त्रीकडेही मी पाहत नाही. दढ चारित्र्यशील राजाने इष्टया जेवणाप्रमाणे इह व परलोक (नियमा) विरुद्ध असलेल्या परस्त्रीचा सदासर्वकाळ
त्याग करावा.' १६. दूतीकार्य जाणून त्याबाबतीत कुशल मंत्री म्हणाले. 'आरम.
हिताचा विचार करणान्यांनी (प्रसंगी) खोटेही बोलावे. १७. स्वामी, संतुष्ट झालेली स्त्री कदाचित नगराचा भेद सांगेल,
खूप सन्मान केल्यावर ती सद्भावपरायण होईल.' १८. 'असे (होऊ दे)' असे म्हणून रावणाने दुतीलाही पाठविले.
जाऊन तिने ( रावणाचा ) सघं संदेश स्वामिनीला सांगितला. दूतीचे बोलणे ऐकूण उपरंभा लगेच निघाली. ती रावणाच्या निवासापाशी आली. तेथे प्रवेश करून ती आनंदाने (आसनावर) बसली. रावण म्हणाला "भद्रे, येथे अरण्यात कसले रति सुख ! दुर्लघपुर (म्ह. राजवाडा) सोडून ते माननीय होणार
नाही.' २१. ते मधुर कामोत्तेजक बोलणे ऐकून कामातुर झालेल्या त्या
(उपरंभे) ने त्याला आशालिका विद्या दिली. २२. ती विधा मिळवून सर्व सैन्य समूहासह दुर्लषपुराजवळ
For Private And Personal Use Only