________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
७. तेव्हा मारले जात असताना राक्षसयोस्यांनी (रावणाकडे)
दूत पाठवला. जाऊन तो राजाला म्हणाला, 'प्रभू, आपण माझे (म्हणणे) ऐकावे.
सर्वत्र धगधगत्या अग्नीमुळे जवळ जाणारे जळताहेत भाणि विकराल मुख असलेल्या यंत्राद्वारे पुष्कळसे मरताहेत.
हे बोलणे ऐकून अत्यंत बुद्धिशाली असे त्यावेळी (श. ज्यावेळी) लंकेश्वराचे मंत्री आपल्या सैन्याच्या रक्षणाकरिता उपाय
योजू (श. चितू) लागले. १०. त्यावेळी नलकूबराच्या उपरंभाराणीने रावणावर प्रेमा
सक्त झाल्यामुळे पाठवलेली दूती आली.
११. मस्तक नमवून प्रणाम कस्न दूती एकांतात रावणाला
म्हणाली, 'स्वामी, ज्या कारणाकरिता मला पाठवले ते ऐकावे.' नलकूबर (महाराजां) ची उपरंभा नावाची प्रसिद्ध राणी आहे. खरे म्हणजे, तिने मला पाठविले आहे. माझे नाव विचित्रमाला आहे.
ती अंतःकरणपूर्वक आपल्या भेटीस उत्सुक असून आप. ल्याशी प्रेमसंबंध घडावा असा विचार करते. आपल्या गुणा. पर ती अत्यंत अनुरक्त आहे. भेट घेण्याची ( श. दर्शन देण्याची) कृपा करा.'
For Private And Personal Use Only