________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
२५. असा विचार करून तो स्मशानात गेला व दोन कलशांनी
विरहित असा त्याने तो खड्डा पाहिला. तेव्हा तो अधिक
शोक करू लागला. २६. हाय रे देवा ! पुण्यविहीन अशा माझे द्रव्य कसे नाहिसे
झाले ? कोणातरी विद्वानाने जे असे म्हटले आहे ते खरेच
आहे. २७. मी दान दिले नाही. निरनिराळ्या प्रकारांनी सुखोपभोग
भोगले नाही. द्रव्य नाहीसेच झाले. तेव्हा मी राजदरबारी
जातो.
२८, २९. मो राजाला सर्व सांगतो. खरोखर कदाचित तो याच्या
कडून द्रव्य देववेल.' तेव्हा त्याने नजराणा देऊन राजाला सांगितले ते असे, ' महाराज, जो बागेमध्ये अनेक प्रकारांनी विलास करतो आहे, तो निश्चितपणे चोर आहे. याने
स्मशानातून खणून माझे द्रव्य घेतले आहे.' ३०. हे ऐकून राजाने कोतवालास आज्ञा केली ती अशी, 'ताबड
तोब त्या अट्टल चोराला बांधून माझ्यापाशी आण.' ३१. त्यानेही तसेच केल्यावर चोर म्हणाला, 'माझा कोणता
दोष ?' राजा म्हाणाला, 'तू याचे द्रव्य खणून घेतलेस. ३२. तो म्हणाला, ' महराज, याने माझे काही घेतले आहे. ते
द्यावयास लावा. मग मी याला द्रव्य देईन.' ३३. राजाने दृष्टिक्षेप केल्यावर तो व्यापारी सांगू लागला, 'भी
For Private And Personal Use Only