________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
१४. अगडदत्ताचा सन्मान
५.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
एके दिवशी तो राजकुमार घोड्यावर बसून घोडयाच्या मैदानाच्या रस्त्यावरून जात होता; तेव्हा (वाराणसी) नगरीत गलबला झाला. आणि तसेच (त्याला वाटले ) - 'समुद्र खवळला आहे का ? किंवा भयंकर अग्नी भडकला आहे ? किंवा शत्रू सैन्य (चालून) आले ? किंवा बीज पडली ? ३४. इतक्या अवधीत राजकुमाराने बांधलेला प्रचंड खांब मोडून ( आलेला ), निष्कारण क्रोधाविष्ट झाल्याने माहुताने ( निरुपाय होऊन ) सोडलेला, कृतांतकाळाप्रमाणे सोंडेच्या टापूत येणाऱ्यांना ठार करीत समोरून येत असलेला, एक मदोन्मत्त हत्ती अवचितपणे आश्चर्यचकित मनाने पाहिला. पायांना बांधलेला दोरखंड तोडून घरे, बाजारातील दुकाने, देवालये विध्वंस करीत तो प्रचंड ( हत्ती ) क्षणात राजकुमारासमोर आला.
६.
त्या तशा तऱ्हेच्या रूपसंपन्न कुमाराला पाहून नागरिक गंभीर आवजाने ओरडले, 'दूर हो, हत्तीच्या मार्गातून दूर हो. '
७. कुमारानेही चालण्यच्या गतीत अत्यंत चतुर असलेल्या आपल्या घोडयास सोडून इंद्राच्या ऐरावतासारख्या असलेल्या गजराजाला हाकारले,
For Private And Personal Use Only