________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
घरामध्ये जातो; त्याप्रमाणे जीव जुने शरीर टाकून
(दुसऱ्या नव्या) शरीररात जातो. ८. ज्याप्रमाणे मेणा (च्या लेपा) ने झाकलेले रत्न आत तेजाने
झळाळत असते; तसाच काहीसा कर्माच्या ढिगात झाकलेला
जीवही खरोखर (आत तेजाने चमकत अललेला) जाणावा. ९,१०. ज्याप्रमाणे दिवा अत्यंत विशाल उंच व भव्य वाड्या
लाही प्रकाशित करतो आणि (छोटया) वेष्टनाच्या पात्रात ठेवला असताना केवळ तेवढेच (पात्र) प्रकाशित करतो; त्याचप्रमाणे जीव लक्षावधी श्वासोच्छ्वास (एकदमः) करणाऱ्या विशाल शरीरालाही सजीव करतो (आणि)पुनः (क्षुद्र असलेल्या) कुंथूच्या शरीरात गेला असताना तेवढ्या
नेच संतूष्ट होतो (म्ह. तेवढ्या आकाराचाच राहतो). ११. ज्याप्रमाणे आकाशातून वाहत असताना वारा लोकांना
दिसत नाही; त्याप्रमाणे, जीवही संसारात भटकत असताना
गेळ्यांना दिसत नाही. १२. ज्याप्रमाणे घरामध्ये घुसत असताना दार (झाकल्या) मुळे
खरोखर वारा आडवता येतो; त्याप्रमाणे, हे जीव, (देह) घरातील इंद्रियदार (झाकून) ( म्ह. इंद्रियनिग्रह करून) पापाला आडव. ज्याप्रमाणे ज्वालासमूहाने भडकलेल्या अग्नीने तृणकाष्ठ जाळता येते; त्याप्रमाणे ध्यानयोगाने जीवाचे कर्ममलही
जाळता येते. १४. ज्याप्रमाणे बीज व अंकुराची कार्यकारणे जाणता येत नाहीत.
१३. ज्याला
For Private And Personal Use Only