________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१७. प्रवचनसार
१. जागृत राहा. (अज्ञान निद्रेतून) का जागे होत नाही ? मृत्यू
नंतर, खरे म्हणजे, आत्मजागृती होणे कठिण आहे.
(गेलेले) दिवस (श. रात्री) परत येत नाहीत. (मानवी) ‘जीवन पुनः मिळणे (तितके) सहज नाही.
२. जन्म मरणासमवेत, तारुण्य म्हातारपणाबरोबर आणि
वैभव विनाशासह प्राप्त होते. असे सर्व क्षणभंगुर जाणा. .
३. संसाररूपी अरण्यात ज्या जीवरूपी हरिणाला त्या मृत्यू.
रूपी सिंहाने (झडप घालून) पकडले आहे; त्यास सोडवण्यास
स्वजन, देव आणि इंद्रही समर्थ नाहीत. ४. ज्याची मृत्यूशी मैत्री आहे, जो ( त्याच्यापासून ) पळून
(स्वतःला वाचवू म्हणतो) आणि 'मी मरणार नाही' असे जाणतो, त्यानेच खरोखर (धर्माचरण) उद्या करावे अशी इच्छा बाळगावी.
(साधकाने) जगण्याची अभिलाषा बाळगू नये. मरणाचीही प्रार्थना करू नये. जीवन आणि तसेच मरण या दोषांमध्ये त्याने आसक्ती दाखवू नये.
For Private And Personal Use Only