________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
अंकुशाने रोखा. आडमार्ग स्वीकारून त्याने शीलरूपी उपवन उध्वस्त करू नये.
१३. जसा काळा कोळसा दुधाने धुतल्याने पांढरा होत नाही,
तसे पापकर्मांनी मलिन झालेली (माणसे) (गंगेच्या)
पाण्याने शुद्ध होत नाहीत. १४. जो प्राणीवध करीत नाही, खोटे बोलत नाही, चोरी
करीत नाही आणि परस्त्रीकडेही जात नाही, त्याच्या घरीच गंगाकुंड असते.
एष ज्याने केव्हाही शील भ्रष्ट होऊ दिले नाही, त्याला (च)
पंडित म्हणतात. तो (च) शूर वीर योद्धा होय की ज्याने
इंद्रियरूपी शत्रूना जिंकले आहे. १६. जो स्थळ व समय (ओळखून) प्रियवचन बोलायला
जाणतो, तो सर्वांनाच पूजनीय असून सर्वांच्याच हृदयाचा आसरा होतो.
१७. तो (माणूस) हातात दिवा असताना जर (डोळयाचा
उपयोग न केल्यामुळे ) विहिरीत पडला, तर तो दिवा त्याला काय करणार? जर (श्रुतज्ञानाचे) शिक्षण घेऊन (त्याप्रमाणे आचरण न करता) चारित्र्य भंग केले तर त्याला शिक्षणाचे काय फळ ? ( ते ज्ञान चारित्र्याभावी त्यास कधीही सद्गतीस नेणार नाही.)
For Private And Personal Use Only