________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
८ तेंव्हा पिता म्हाणाला, 'बाळ, चांगली पाहणी केल्यास येथे
कोणता तोटा (श. दोष) होणार आहे ?' असे म्हटल्यावर
मुलाने जाऊन सर्व न्याहाळले. ९. तेव्हा मेल्याचे सोंग घेऊन निश्चेष्ट पडलेला व श्वास रोखून
द्रव्याच्या ठिकाणी पाहत असलेला भिकारी दिसला १०,११. त्याने येऊन सांगितले, 'श्वास नसलेला कोणीतरी तेथे
(पडला) आहे. तेव्हा श्रेष्ठीही म्हणाला, 'पण जर का तो द्रव्यलोभाने श्वास रोखून मेल्याचे सोंग घेऊन पडला असेल,
तर सुरीने त्याचा कोणता तरी अवयव कापून लोकर ये.' १२. असे म्हटल्यावर तो कान कापून आला. तेव्हा तो म्हणाला,
'कदाचित पुनः तो धूर्त हे सहन करील. ( सेव्हा ) दुसराही
कान काप. १३. त्यानेही तसेच केले. ओठाबरोबर नाकही कापले. त्यानेही
धनाकरिता सर्व सहन केले. कारण असे म्हटले आहे. १४. माणसे (श. प्राणी) धनाकरिता जे करणार नाहीत असे
साहस नाही. ते स्वतःचे जीवनही बेचतील. मग शरीर.
छेदनाविषयी काय (सांगावे) ? १५,१६,१७. तेव्हा भिकायाला मढे समजून तो श्रेष्ठी मुला सह
घरी गेला. भिकाऱ्यानेही येथून झटदिशी उठून ते द्रव्य घेतले व दुसरीकडे दडविले. (त्यातील) किती तरी घेऊन तो नगरात गेला. त्याने कपडे, चंदन, कापूर, वगैरे घेतले. झिरझिरीत वस्त्राने कापलेले अवयव झाकून तो वेश्यांच्या घरांमध्ये विलास करू लागला.
For Private And Personal Use Only