________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
५ कुलवधू
पुडवर्धननगारात एक श्रीमान तरुण ऐन तारुण्यात आलेल्या आपल्या पत्नीस सोडून (व्यापाराकरिता) देशांतरास गेला. आकरा वर्षे उलटलीः
एकदा नवं लोकात उन्माद निर्मान करणारा, रज रेणूंनी भरलेली फुले असलेला, दक्षिणे कडील (सुखकर असा मलय) वायू पसरविणारा, कालकलाट माजविणारा आणि मेळयातील गायकांच्या आकर्षक गीतांनी तरुणजनांना आनंदित करणारा वसंतऋतू सुरू झाला असताना वधू मैत्रिणीसमवेत (नगरा) बाहेररील बागेत गेली.(तेथील) वापिकेत प्रेमाचा आदर्श अशी चक्रवाकांची जोडपी क्रीडा करत असलेली आणि दुसरीकडे सारसांची जोडपी ( रमत असलेली) पाहिली. हंसीचा अनुनय करणारा हंस (पण)पाहिला. तेव्हा वसंताच्या कमावासना उद्दीपित करण्यामुळे, उपवनाच्या रमणीयते. मुळे, परिवाराच्या उत्कट प्रेमामुळे, विषयाभिलेषाच्या अनेकजन्मातील सवयोमुळे, तारुण्याच्या विकारबाहुल्यामुळे आणि इंद्रियाच्या चंचलतेमुळे अत्यंत दुःख देणाऱ्या महाव्याधीशप्रमाणे तिच्या सर्व शरीरात मदनाचा संचार झाला. तिने (परतण्याचा) विचार केला (प्रवासास गेलेल्या) त्या निर्दयाने दिलेला अवधी संपला, तो आला नाही, तेव्हा कोणातरी तरुणाला आणविते.' तिने हे काम
For Private And Personal Use Only