________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
आरशातील प्रतिबिंबाप्रमाणे बुद्धिमान असलेल्या तिन्या. मध्ये सर्व कला संक्रांत झाल्या आणि अध्यापक केवळ साक्षी
होता.
ती तारुण्यात आली. तिला पाहन आईवडिल विचार कर लागले,'ही असामान्य सौंदर्यशालीनी असून विधीच्या विज्ञानाचा प्रकर्ष आहे. तेव्हा हिला अनुरूप वर (दिसत) नाही. जरी असला तरीही तो आम्हाला माहित नाही. म्हणून स्वयंवर करणे योग्य आहे.'
तेव्हा दूत पाठवून राजे आणि राजपुत्रांना बोलावले. ते हनी, घोडे, रथ व पायदळाममवेत आले. अनुपमेय सत्वशील असा नळही तेथे आला. भीमराजाने सन्मान केल्यावर ते उत्कृष्ट निवासस्थानी राहिले. सुवर्णमय खांबांने सुशोभित असा स्वयंवर मंडप करविला. तेथे उत्तम आकाराची सिंहासने ठेवली. त्यावर राजे बसले.
इतक्या अवधीत पित्याच्या आदेशानुसार मोहक रविबिंब असलेल्या पूर्वदिशेप्रमाणे पसरलेल्या प्रभाकिरणसमूहांनी युक्त अशा भालावरील (स्वाभाविक) तिलकाने अलंकृत झालेली संपूर्ण चंद्रम्याने सुंदर दिसणाऱ्या पौणिमेच्या रात्रीप्रमाणे प्रमन्न नेहरा असलेली आणि शुभ्र रेशमी वस्त्र परिधान केलेली दमयंती स्वयंवर मंडप भूषवित आलो. तिला पाहून आश्चर्ययुक्त चेहयांनी राजांनी तिलाच आपल्या नेत्र कटाक्षाचा लक्ष्य केले. - तेव्हा राजाच्या आदेशाने अंतःपुरातील द्वारपालिका भद्रा राज. कुमारीच्या पुढे होऊन राजांचे व राजकुमारांचे विक्रम सांगू लागली.
For Private And Personal Use Only