________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
७ दमयंती स्वयंवर
येथे भारतक्षेत्रात कोशलदेशामध्ये कोशलानगरी होती. तेथे इक्ष्वाकुकुलात जन्मलेला, असामान्य न्याय, त्याग व पराक्रमाने युक्त असा निषध नावाचा राजा होता. त्यास सुंदरीगणीच्या पोटी जन्मलेले, लोकांच्या मनाला आनंद देणारे नल व कबर (नावाचे) दोन पुत्र होते.
इकडे विदर्भदेशाला भूषणभूत असे कुंडिननगर होते. तेथे शत्रूरूपी हत्तींच्या कळपांना ( जेरीस आणणारा ) शरभ असा भीमरथ राजा होता. त्याची सर्व अंतःपुररूपी झाडाचे ( मोहक ) फूलच अशी पुष्पदंती राणी होती. वैषयिक सूखांचा उपभोग घेत असताना त्यांना अखिल त्रिभुवनाला भूषणभूत अशी कन्या झाली.
· सत्पुरुषाच्या छातीवर उत्कृष्ट श्रीवत्सचिन्ह ( श. रत्न ) असावे, त्याप्रमाणे तिच्या कपाळावर सूर्यबिंबासारखा स्वाभाविक तिलक होता.
ही मातेच्या गर्भात असताना मी सर्व शत्रूचे दमन केले, असा (विचार करून) पित्याने तिचे दमयंती असे नाव ठेवले. शुक्लपक्षातील चंद्रकोरीप्रमाणे सर्व जनतेच्या डोळ्यांना आनंद देणारी ती मोठी होऊ लागली. आणि (योग्य) वेळी (विद्या प्रहण करण्याकरिता) तिला कलाध्यापकाच्या स्वाधीन केले.
For Private And Personal Use Only