________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
श्रमलेल्या हातावर तिचा ताबा न राहून ते जण परक्याचे झाले. तसेच यावेळी तिच्या लग्नाच्या वाटाघाटी सुरू असल्यामुळे अत्यंत प्रेमामुळे ते हात
आता दुसऱ्याचे झाले असा श्लेष) दासी-खेळावे, तोवर राजकुमारींनी खेळावे, तोवर कौमार्यपणाचा
हा रमणीय काळ उपभोगावा. पद्मावती-आर्ये, चेष्टा करण्याकरिताच जणू आता माझ्याकडे
रोखून का पाहता ? वासवदत्ता-नाही, नाही. हले आज तू भारीच सुंदर दिसतेस. जणू
सर्वबाजूंनी आज तुझे बरमुख पाहते आहे. ( श्लेषाने श्रमाने अधिक लाल झालेला तुझा सुंदर चेहरा सर्व बाजूंनी पाहावासा वाटतो. तुझ्या वराचे वदन जणू तुझ्या सन्निध फिरतेम्हणजे विवाह जवळ आलेल्या कन्येसारखी आज तू मला अतिशय सुंदर दिसतेस) पद्मावती-जा. आता माझी चेष्टा करू नका. वासवदत्ता-महासेनाच्या भावी सूनबाई, ही मी गप्प बसले. पद्मापवती-हा महासेन नावाचा कोण ? वासवदत्ता-उज्जैनीचा प्रद्योत नावाचा राजा आहे. सैन्याच्या
( मोठया) प्रमाणावरून त्याचे महासेन असे नाव
पडले आहे. दासी- त्या राजाशी संबंध (जडावा अशी) राजकुमारीची इच्छा ..नाही. .
For Private And Personal Use Only