________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
पाहिले. हाय! (काय हा) अज्ञानाचा दोष!' विचार करुन त्यांना बोध करण्याच्या हेतूने साध्वींच्या बरोबर विहार करीत ती मथुरेस गेली. ती कुबरसेनेच्या घरी वस्ती मागून (म्ह. राहण्याची परवानगी घेऊन राहिली ती (कुबेरसेना) वंदन करून म्हणाली, 'भगकतींनो. भी केवळ जन्लाने गणिका आहे, पण आचरणाने नव्हे. कारण आता चांगल्या कुळातील वधूप्रमाणे मी एका पुरुषाची सेवा करते. माझे निवासस्थान शंकाविरहित आहे. तेव्हा माझ्यावर अनुग्रह करून आपण ( येथे ) राहावे.' त्या तेथे राहिल्या. तिचा ( कुबेरदत्ता पासून झालेला) मुलगा लहान होता. ती त्याला पुनः पुन्हा साध्वी जवळ ठेवू लागली. तेव्हा त्यांची (योग्य वेळ (म्ह. काललब्धी) जाणून साध्वी त्यांना बोध करण्याकरिता खालील गाथा गाल मुलाला जोजवू लागली (श. मुलाची स्तुती करू लागली.)
'बाळ, तू (एकाच आईच्या पोटी जन्मलेला म्हणून) माझा भाऊ आहेस' एकाच आईच्या पोटी जम्मलेला असा माझ्या पतीचा भाऊ म्हणून) माझा दीर आहेम, ( माझ्या पतीपासून झालेला म्हणून) माझा पुत्र आहेस, ( माझ्या पतीच्या दुसन्या स्त्रीचा पुत्र म्हणून ) सवतीपुत्र आहेस, (माझ्या कुबेरदत्त भावाचा पुत्र म्हणून) भाचा आहेस, आणि ( एकाच मातेच्या पोटी जन्मल्यामुळे माझा भाऊ झालेल्या तुझा पिता पर्यायाने माझाही पिता झाला. एकाच मातेच्या कुबेरसेनेच्या पोटी जन्मल्यामुळे तु त्याचाही माऊ झालास. म्हणजे पर्यायाने पित्याचा भाऊ म्हणून) काका आहेम.
तू ज्याचा पुत्र आहेस तोही ( कुबेरसेनेच्या पोटी जुळा अन्मलेला म्हणून माझा भाऊ, (त्याशी लग्न झाले म्हणून)पती, (बालक
For Private And Personal Use Only