________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
ऋमाने वाढत ती दोधे) तारुण्यात आली. योग्य संबंध' म्हणत कुबेरदतेला कुबेरदत्तास दिले. लग्नदिवस संपताच वधूच्या मैत्रिणींनी घराशी द्यूत आरंभिले. (तो हरल्यावर ) त्यांनी कुबेरदत्ताच्या हातून (त्याच्या ) नावाची आंगठो घेऊन कुबेरदत्तेच्या हाती दिली. ती पाहत असताना सारखी घडण व नाव पाहून (तिच्या मनात)विचार आला, मला वाटते, कोणत्या कारणाकरिता बरे या आंगठयांची नावे, आकार सारखी आहेत? माझ्या (मनात ) कुवरदत्ताविषयी पतिभाव नाही. आमचा कोणी पूर्वज या नावाचा ऐकिवात नाही. तेव्हा या बाबतीत ( काहीतरी ) रहस्य असावे.' असा विचार करून तिने घराच्या हाती दोन्ही आंगठया ठेवल्या.
(त्या)पाहत असताना त्याच्याही(मनात) तसाच विचार आला. वधूला आंगठी देऊन तो आईपाशी गेला. त्याने तिला शपथ घालून विचारले. तिने जसे ऐकले होते तसे सांगितले. तो म्हणाला, आई तुम्ही अयोग्य केले.' ती म्हणाली, 'आम्ही मोहवश झालो होतो (जे झाले ) ते झाले. केवळ पाणिग्रहण करण्यापुरतीच वधू दूषित झाली आहे. याबाबतीत पाप नाही. मी मुलीला तिच्या घरी पाठवीन, तू प्रवासाहून परत आल्यावर तुझा योग्य संबंध घडवून आण.न.' असे म्हणून तिने कुबेरदत्तेला तिच्या घरी पाठविले.
तिनेही (आपल्या) आईला तसेच विचारले. तिने जसे घडले तसे सांगितले. त्यामुळे संसाराविषयी विरक्ती वाटून तिने दीक्षा घेतली. प्रवर्तिनी बरोबर ती विहार करू लागली. प्रवर्तिनीच्या सांगण्यावरून तिने आगठया जपून ठेवल्या.
चारित्र्य शुद्ध होत असल्यामुळे तिला अवधिज्ञान प्राप्त झाले ( अवधिशानाने ) कुबेरसेनेच्या घरी राहत असलेल्या कुधरदत्तास
For Private And Personal Use Only