________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
४ कमळे चिखलात उगवतात
मथुरानगरीमध्ये कुबेरसेना गणिका होती. पहिल्या गर्भार. पणात डोहाळयाचा त्रास झाल्यामुळे मातेने तिला वैद्यास दाखवले. त्याने म्हटले. 'गर्भातील जळचाच्या दोषाने हिला त्रास होतो आहे. (दुस-या) कोणत्या रोगाचा दोष नाही.'
ही गोष्ट कळताच माता म्हणाली, 'मुली, प्रसूतीचीच्या बेळी तुला शारिरीक त्रास होऊ नये (म्हणून) गर्भपाताचा उपाय शोधते. तेव्हा तू निरोगी होशील आणि सुखोपभोगात अडथळा (ही) होणार नाही. (नाहीतरी) वेश्यांना मुले काय कामाची?' . तिने (तशी) इच्छा केली नाही. ती म्हणाली, 'मुलांना सोडून देईन' तसे काबूल करताच (योग्य) वेळी ती मलगा व मुलगी प्रसूत झाली. मातेने म्हटले, ' यांचा त्याग केला जाऊ देत.' 'ती म्हणाली, तोवर दहा दिवस (श. रात्री) पुरे होऊ देत.
तेव्हा तिने कुबेरदत्त व कुबेरत्ता अशी नावे कोरलेल्या दोन आंगठया करविल्या. दहा दिवस (स.रात्री) संपल्यावर (भरपूर) सोने व रत्ने भरलेल्या छोटयाशा (दोन ) होडयात त्यांना (अलग अलग) ठेवून यमुनानदीत सोडले. वाहत जात असताना दोन श्रीमंतांच्या मुलांनी त्यांना पाहिले. त्यांनी होडया धरल्या. एकाने मुलास व ऐकाने मुलीस घेतले. द्रव्ययुक्त असल्यामुळे संतुष्ट होऊन त्यांनी त्यांना मापापल्या घरी नेले.
For Private And Personal Use Only