Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
प्रसंग चवथा : ५१
तो समंतभद्र गूढ यति । ऐसि पाहोनिया वृत्ति । अद्भुत हर्ष मानिला चित्ति । म्हने क्षुद्व्याधि शांति होय येथे ४५ ऐसे पाहोनि नयनि । बैसता झाला योग्य स्थानी। शिवभक्त पूजा करोनि । समस्तान्न आनोनि द्वारि ठेविले ॥४६।। तदा त्या पूजक जनासि । वदता झाला गुप्त ऋषि । ऐसे सामर्थ नसे कौनासि । हे सर्वान्न देवासि भक्षवी ॥४७॥ ऐसे आइकोनि वचन । वदते झाले मुनि कारण । पाषाण मूर्ति सि भोजन । करवायाचा गुण नसे आम्हा ॥४८॥ हे सामर्थे असे तुजपासि । तरी संपूर्ण भक्षरासि । भोजन करवि विश्वरासि । त्वत्कीति देशाशि जाइल ॥४९।। तद्वाक्य ऐकोनि सत्वर । वदे स्वात्मबडिवार । म्हणे मी भक्ति करोनि थोर । करिन इश्वर तृप्त भोजनी ॥५०॥ तद्वाक्य ऐकोनि श्रवणि । सीघ्र जावोनि राजभुवनि । मात जानविलि नृपालागुणि । आश्चर्य मनि जन मानिति ॥५१॥ राया तव शिवालयाप्रति । कोन्ही यक आला असे यति । तो वदता झाला आम्हा प्रति । ते तू ऐक चित्ति धरोनिया ॥५२॥ आम्ही जावोनि शिवमंदिरि । भक्ति धरोनिया थोरी। तव नैवेद्य मनोहरि । अर्पोनि बाहिरि ठेविले ॥५३॥ तेन्हे पाहोनि पक्वान्नराशि । वदे वाक्य भाक्तिकासि । ऐसे सामर्थ्य नसे कौनासि । सर्वान्न शिवासि भक्षवि ॥५४॥ तद्वाक्य ऐकोनि भक्तजन । वदते झाले त्या कारण । तुजपासि असे ऐसा गुण । तरी करोन दावि आम्हा ॥५५॥ तो म्हने जावोनि सत्वरि । पक्वान्ने आना नानापरि । तुमचा देव त्रिशूलधारि । त्यासि भक्ष सत्वरि भोजवितो ॥५६॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org