Book Title: Pati Patnicha Divya Vyavhar Author(s): Dada Bhagwan Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust View full book textPage 9
________________ हे तर त्याचे एक्सपर्ट अनुभवीच शिकवू शकतील. संपूर्ण आत्मज्ञानी पूज्य दादाश्री, स्वत:च्या पत्नीसोबतच्या आदर्श व्यवहाराला पूर्णपणे अनुभवून, अनुभववाणी द्वारा त्याचे समाधान करतात, जे अत्यंत प्रभावीपणे काम करते. संपूज्य दादांश्रीकडे कितीतरी पती, पत्नी आणि जोडप्यांनी स्वत:च्या दुःखमय जीवनातील समस्यांचे विवरण केले, कधी खाजगीमध्ये तर कधी जाहीर सत्संगात! ह्या विशेष गोष्टी जास्त करुन अमेरिकेत झाल्या होत्या. जिथे सर्व फ्रीली, मनमोकळेपणाने स्वत:च्या खाजगी जीवनाबद्दल बोलू शकतात. निमित्ताधीन परम पूज्य दादांश्रीची अनुभववाणी निघाली ज्याचे संकलन प्रत्येक वाचणाऱ्या पति-पत्नीला मार्गदर्शक ठरेल, हे निश्चित आहे! कधी पतीला टोकणे तर कधी पत्नीला झटकणे, ज्या निमित्ताला जे सांगणे आवश्यक असेल त्याला ते आरपार बघून निष्कर्ष काढून दादाश्री आपल्या वचनबळाने रोग निर्मुलन करत होते. सुज्ञ वाचकांना हिच विनंती की गैरसमजुतीने दुरुपयोग करु नका की दादांनी तर स्त्रियांचेच दोष दाखविले आहेत, किंवा पतीच्या मालकीपनालाच दोषित ठरवले आहे! मालकाच्या मालकीपणाचे दोष दाखवणारी वाणी आणि पत्नीला पत्नीच्या प्राकृतिक दोषांना दर्शवणारी वाणी दादांच्या श्रीमुखातून प्रवाहित झाली आहे. ती योग्य रीतीने ग्रहण करुन स्वत:च्या शुद्धीकरण हेतू मनन, चिंतन करावे हीच पाठकांना नम्र विनंती! डॉ. नीरुबहन अमीनPage Navigation
1 ... 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 ... 126