Book Title: Death Before During and After Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 18
________________ मृत्यूवेळी, आधी आणि नंतर साधेपणाचा फायदा घेतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो की, लोकं जेव्हा दुसऱ्या दिवशी येऊन विचारतील तेव्हा तुम्ही काय सांगायचे की, 'भाऊ, काकांना जरा ताप आला आणि टप्प झाले; आणखी काहीही झाले नव्हते. समोरचा विचारेल तेवढेच बोला. आपल्याला समजायला हवे की विस्ताराने सांगायला गेलो तर झंझट होईल. त्यापेक्षा, रात्री ताप आला आणि सकाळी टप्प झाले, असे सांगितले की मग कोणतीच झंझट उरत नाही ना ! 7 , स्वजनांचा अंतिमकाळी सांभाळ प्रश्नकर्ता : एकाद्या स्वजनाचा अंतकाळ जवळ आला असेल तर त्याच्याशी जवळच्या नातेवाईकांची वागणुक कशी असायला हवी ? दादाश्री : ज्याचा अंतिमकाळ जवळ आला असेल, त्यांना तर अतिशय चांगल्याप्रकारे सांभाळायला हवे. त्याचा प्रत्येक शब्द सांभाळायला हवा. त्याला नाराज करु नये. सगळ्यांनी त्याला खूश ठेवायला हवे, आणि तो जरी काही उलट बोलला तरीही आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे की, 'आपले बरोबर आहे !' ते म्हणतील की, दूध द्या, तर लगेचच दूध आणून द्यायचे. ते म्हणतील की, 'हे तर पाण्यासारखे आहे, दूसरे आणा. ' तर लगेच दुसरे दूध गरम करुन आणून द्यायचे. आणि सांगायचे की, 'हे शुद्ध आणि चांगले आहे.' म्हणजे त्यांना अनुकूल राहील असेच केले पाहिजे. असेच सगळे बोलायला हवे. प्रश्नकर्ता : म्हणजे त्यात खऱ्या- -खोट्याच्या भानगडीत पडू नये ? दादाश्री : खरे-खोटे तर या जगात नसतेच. त्यांना बरे वाटले की बस, त्यानुसार सर्वकाही करायला हवे. त्यांना अनुकूल वाटेल असेच वर्तन करायला हवे. लहान मुलांसोबत आपण कशाप्रकारे वागतो ? मुलाने काचेचा ग्लास फोडला तरी आपण त्याला रागावतो का ? दोन वर्षाचा मुलगा असला तरी त्याला विचारतो की, का फोडलास ? किंवा असे तसे काही ? मुलांबरोबर जसा व्यवहार करतो, तसाच व्यवहार त्यांच्याबरोबरही करायला हवा.

Loading...

Page Navigation
1 ... 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62