Book Title: Death Before During and After Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 55
________________ मृत्यूवेळी, आधी आणि नंतर इफेक्ट उत्पन्न होतच राहतात. इफेक्टमधून परत कॉजेस उत्पन्न होणार आणि ते कॉजेस परत पुढच्या जन्मी इफेक्ट देतील. कॉजेस अॅन्ड इफेक्ट, इफेक्ट अॅन्ड कॉजेस, कॉजेस अॅन्ड इफेक्ट, इफेक्ट अॅन्ड कॉजेस, कॉजेस अॅन्ड इफेक्ट, हे चालूच राहते. म्हणून ज्ञानी पुरुष जेव्हा कॉजेस बंद करतात तेव्हा फक्त इफेक्टच भोगावे लागतात. म्हणून कर्मबंधन बंद होऊन गेले. म्हणून सर्व 'ज्ञान' लक्षात राहते, एवढेच नाही, तर स्वतः ते स्वरुपच होऊन जातो. मग मरणाचीही भीती वाटत नाही. कशाचीच भीती वाटत नाही, निर्भयता राहते. अंतिम वेळी जागृती जिवंत आहोत, तोपर्यंत प्रश्नकर्ता : दादाश्री, ज्ञान घेण्याआधी या जीवनात जे पर्याय बांधले गेले आहेत, त्याचे निराकरण कसे होईल? दादाश्री : आता जिवंत आहोत, तोपर्यंत पश्चाताप करुन त्यांना धुवून टाकायचे, परंतु ते ठराविकच, पूर्ण निराकरण होत नाही. परंतु सैल तर होतातच. सैल होतील म्हणून पुढील जन्मात हात लावताच लगेच गाठ सुटून जाते. प्रश्नकर्ता : प्रायश्चित्ताने बंध सुटतात? दादाश्री : हो, सुटतात? ठराविक प्रकारचे कर्म बंध आहेत, ते कर्म प्रायश्चित करण्याने मजबूत गाठीतून सैल होतात. आपल्या प्रतिक्रमणात खूप शक्ती आहे. दादांना साक्षी ठेवून कराल तर काम होईल. हे ज्ञान मिळाल्यानंतर हिशोब महाविदेहचा कर्माच्या धक्क्याने जे जन्म होणार असतील ते होतील. कदाचित

Loading...

Page Navigation
1 ... 53 54 55 56 57 58 59 60 61 62