________________
शुद्धात्मा प्रति प्रार्थना
हे अंतर्यामी परमात्मा ! आपण प्रत्येक जीवमात्रांमध्ये विराजमान आहात, तसेच माझ्यामध्ये पण विराजमान आहात, आपले स्वरूप हेच माझे स्वरूप आहे, माझे स्वरूप शुद्धात्मा आहे.
हे शुद्धात्मा भगवान ! मी आपल्याला अभेदभावे अत्यंत भक्तीपूर्वक नमस्कार करीत आहे.
अज्ञानतेमुळे मी जे जे ★ ★ दोष केले आहेत, त्या सर्व दोषांना आपल्या समक्ष जाहीर करीत आहे. त्याचे हदयपूर्वक खूप पश्चाताप करीत आहे आणि आपल्याजवळ क्षमा प्रार्थित आहे. हे प्रभू! मला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा आणि पुन्हा असे दोष करू नये अशी आपण मला शक्ति द्या, शक्ति द्या, शक्ति द्या.
हे शुद्धात्मा भगवान ! आपण अशी कृपा करा की आमचे भेदभाव मिटून जावे आणि अभेद स्वरूप प्राप्त व्हावे. आम्ही आपल्यात अभेद स्वरूपाने तन्मायाकार राहू.
★★ (जे जे दोष झाले असतील ते मनात जाहीर करावे. )
प्रतिक्रमण विधि
प्रत्यक्ष दादा भगवानांच्या साक्षीने देहधारी ...... (ज्याच्या प्रति दोष झाला असेल त्या व्यक्तिचे नाव) च्या मन-वचन-कायेचे योग, भावकर्म, द्रव्यकर्म, नोकर्माहून भिन्न असे हे शुद्धात्मा भगवान ! आपल्या साक्षीने, आजच्या दिवसापर्यंत जे जे ★ ★ दोष झाले आहेत, त्यांची क्षमा मागत आहे, हृदयपूर्वक खूप पश्चाताप करीत आहे. मला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. आणि पुन्हा असे दोष कधीही करणार नाही, असा दृढ निश्चय करीत आहे, त्यासाठी मला परम शक्तिद्या.
** क्रोध-मान-माया-लोभ, विषय-विकार, कषाय इत्यादीपासून त्या व्यक्तिला दुःख दिले गेले असेल त्या सर्व दोषांना मनात आठवायचे.